भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने 14 सप्टेंबरच्या रात्री उशिरा आपली शानदार कामगिरी दाखवून दिली होती. त्याने डायमंड लीगच्या फायनलमध्ये तंदुरुस्त (मोडलेला हात) नसताना देखील अंतिस सामन्यात भाग घेतला होता. परंतु नीरजला डायमंड ट्रॉफी जिंकता आली नाही. पण त्याने सर्वोत्तम कामगिरी करत त्याने दुसरे स्थान पटकावले होते. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
नीरज चोप्राच्या हाताची शस्त्रक्रिया सोमवारी (16 सप्टेंबर) स्वित्झर्लंडमध्ये झाली. सूत्रांनी नीरजची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. 15 सप्टेंबर रोजी डायमंड लीगच्या फायनलनंतर नीरजने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याच्या तुटलेल्या हाताचा खुलासा केला होता.
नीरज चोप्राला 9 सप्टेंबरला सरावादरम्यान ही दुखापत झाली होती. वैद्यकीय टीम मदतीने तो डायमंड लीगचा अंतिम सामना खेळू शकल्याचे त्याने सांगितले होते. मात्र तो विजेतेपदासाठी थोडा कमी पडला मात्र दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 87.87 मीटर फेक करून विजेतेपद पटकावले. म्हणजे नीरज फक्त 1 सेंटीमीटरने मागे राहिला.
फायनलनंतर नीरजने पोस्ट शेअर करत म्हणाला होता ‘2024 चा सीझन संपत असताना, मी वर्षभरात शिकलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवत आहेत ज्यात सुधारणा, अपयश, मानसिकता आणि बरेच काही आहे. सोमवारी (९ सप्टेंबर) मला सरावाच्या वेळी दुखापत झाली आणि माझ्या डाव्या हाताच्या चौथ्या मेटाकार्पल हाडला फ्रॅक्चर झाल्याचे एक्स-रेमध्ये उघड झाले. हे आणखी एक वेदनादायक आव्हान होते, पण माझ्या टीमच्या (डॉक्टरांच्या) मदतीने मी ब्रुसेल्समध्ये (डायमंड लीग फायनल्स) भाग घेऊ शकलो.
नीरजने 2022 मध्ये डायमंड लीग जिंकली आहे. आता दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचे त्याचे स्वप्न भंगले. नीरजचा सामना ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील अलियान्झ मेमोरियल व्हॅन डॅमे येथे झाला. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 86.82 मीटर भालाफेक केली. त्याचा दुसरा प्रयत्न 83.49 मीटर होता. त्यानंतर त्याचा तिसरा प्रयत्न87.86 मीटर होता हा थ्रोच त्याचा सर्वोत्तम ठरला.
नीरज चोप्राची अंतिम फेरीतील कामगिरी:
पहिला प्रयत्न- 86.82 मीटर
दुसरा प्रयत्न- 83.49 मीटर
तिसरा प्रयत्न- 87.86 मीटर
चौथा प्रयत्न- 82.04 मीटर
पाचवा प्रयत्न- 83.30 मीटर
सहावा प्रयत्न –86.46 मीटर
हेही वाचा-
सूर्यानंतर टी20 संघाचे कर्णधारपद कोणाला? दिग्गजाने उघड केले ‘नेक्स्ट सुपरस्टार’चे नाव
‘या’ 3 दिग्गजांच्या नावावर कसोटीमध्ये दोन्ही डावात शून्यावर बाद होण्याचा खराब रेकाॅर्ड
आयपीएलमधून लवकरच निवृत्त होणार का धोनी? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य