रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ रविवारी (२८ ऑगस्ट) आशिया चषक स्पर्धेतील अभियानाची सुरुवात करेल. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध भारताला त्यांचा पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळायचा आहे. भारताने विक्रमी ७ वेळा आशिया चषक जिंकला आहे. भारत एकमेव संघ आहे, ज्यांनी आशिया चषकात विजेतेपदाची हॅट्रिक केली आहे. यावर्षी संघ दुसऱ्यांदा हा चषक जिंकण्याची हॅट्रिक करू शकतो.
यावर्षीचा आशिया चषका श्रीलंकेत खेळला जाणार होता, पण काही कारणास्तव ही स्पर्धा यूएईत आयोजित करावी लागली. यापूर्वी भारताने २०१६ आणि २०१८ साली खेळल्या गेलेल्या आशिया चषकात विजेतेपद पटकावले होते. अशात यावर्षी जर संघाने विजेतेपद पटकावले, तर संघ दुसऱ्यांदा या चषकाची हॅट्रिक करेल.
भारतीय संघाने आशिया चषकाच्या विजेतेपदाची पहिली हॅट्रिक १९९५ मध्ये केली होती. तेव्हा संघाने १९८८, ११९० आणि १९९५ साली खेळल्या गेलेल्या आशिया चषकात विजेतेपद पटकावून हॅट्रिक पूर्ण केली होती. दरम्यानच्या काळात भारताने २०१० सालच्या अशिया चषकात देखील विजेतेपद पटकावले होते. संघाने २०१४ पासून आशिया चषकात एकही सामना गमावला नाहीये. यादरम्यान भारताने सलग १२ विजय मिळवले. 2014 हंगामात भारताने शेवटचा सामना अफागाणिस्तानसोबत खेळला होता आणि ८ विकेट्सने जिंकला देखील होती. असे असले तरी, त्या हंगामाचे विजेतेपद श्रीलंकन संघाने जिंकले होते.
मागच्या दोन आशिया चषकात भारतीय संघ अजिंक्य आहे. २०१६ हंगामात भारताने अंतिम सामन्यासहीत एकूण ५ सामने जिंकले. अंतिम सामन्यात त्याने बांगलादेशला ८ विकेट्से मात दिली होती. त्यावेळी आशिया चषक पहिल्यांदाच टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला गेला होता. अंतिम सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना १२० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने २ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवलेला.
२०१८ सालचा आशिया चषक यूएईत खेळला गेला होता. एकदिवसीय प्रकारात खेळल्या गेलेल्या या हंगामात भारताने अंतिम सामन्यासहीत एकूण ६ सामने खेळलेए आणि यापैकी ५ सामने जिंकले. अफगाणिस्तनविरुद्धचा एक सामना निकाली निघाला नव्हता. अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला ३ विकेट्सने मात दिली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने दाखवला आपला दबदबा! अवघ्या 105 धावात गुंडाळला श्रीलंकेचा डाव
भारताचा स्टार अष्टपैलू आता सिनेसृष्टीत करतोय पदार्पण! चित्रपटाचा ट्रेलर पाहून सुरेश रैना झाला फॅन
‘नादचं नाय!’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स अँडरसनच्या नावावर; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली खास कामगिरी