---Advertisement---

विराटसेना तिसऱ्या डावात गाठणार ५०० धावांचा पल्ला? याआधी हेडिंग्लेमध्येच केली होती ही कामगिरी

---Advertisement---

कसोटी क्रिकेट दररोज आपला रंग बदलते आणि हेच तर त्याचे सौंदर्य आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतही हे दिसून येत आहे. भारतीय संघाने शेवटच्या दिवशी दुसरी कसोटी जिंकली. इंग्लिश संघ अवघ्या 120 धावांवर गारद झाला. तेव्हा असे म्हटले जात होते की, इंग्लंड ही मालिका 3-0 किंवा 4-0 ने गमावेल. भारताचे माजी दिग्गज सुनील गावसकरही असेच बोलत होते. पण तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाच्या खेळाच्या अंदाजांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. भारतीय संघ फक्त 78 धावांवर सर्वबाद झाला.

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ केवळ 78 धावसंख्येवर बाद झाला. दुसरीकडे इंग्लंडने एकही विकेट न जाऊ देता 120 धावा केल्या होत्या. म्हणजेच एकाच दिवशी भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करावी लागली आणि दोन्हीमध्ये भारतीय संघाने खराब प्रदर्शन केले. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 354 धावांची आघाडी घेतली. यानंतर असे म्हटले गेले की, सामन्यात भारतीय संघासाठी काहीही शिल्लक राहिलेले नाही. हेडिंग्लीच्या खेळपट्टीवर जेम्स अँडरसन समोर खेळणे सोपे होणार नाही.

पण भारतीय संघाच्या फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी पुन्हा वेग पकडला. दिवसाचा खेळ संपल्यावर संघाने 2 गडी गमावून 215 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 91 धावावर खेळत आहे; तर कर्णधार विराट कोहली 45 धावा करत दुसरे टोक लावून धरले आहे. याशिवाय रोहित शर्मानेही 59 धावांचे योगदान दिले आहे. मात्र, अजूनही भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 139 धावांनी मागे आहे.

भारतीय संघाची कोलकाता कसोटी अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे. 2001 मध्ये झालेल्या या कसोटीत भारतीय संघाने फॉलोऑन घेऊनही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता भारतीय चाहते हेडिंगलेमध्येही अशाच चमत्काराची वाट पाहत आहेत.

याआधीही भारतीय संघाने तिसऱ्या डावात 510 धावा केल्या आहेत
जर भारतीय संघ हेडिंग्लेमध्ये 500 धावा करण्यात यशस्वी ठरला; तर सामन्यात काहीही होऊ शकते. भारतीय संघाने या मैदानावर हे आधीही केले आहे. 1967 मध्ये संघाने इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले येथे कसोटी सामना खेळताना तिसऱ्या डावात 510 धावांची मोठी धावसंख्या केली होती. मन्सूर अली खान पतौडीने 148 धावा केल्या होत्या. याशिवाय फारुख इंजिनिअर आणि अजित वाडेकर यांनी अनुक्रमे 87 आणि 91 धावा केल्या.

इंग्लिश संघाबद्दल बोलायचे झाले तर, तिसऱ्या डावात तो कधीच 500 धावांचा टप्पा गाठू शकलेला नाही. आत्तापर्यंत 490 धावा ही त्यांची सर्वात मोठी धावसंख्या आहे.

त्यामुळे जर भारतीय फलंदाजांनी चौथ्या दिवशीही मोठ्या आकडी धावा केल्या, तर संघाच्या विजयाच्या शक्यता वाढतील.

महत्त्वाच्या बातम्या-

‘रिषभला स्टान्स का बदलायला सांगितला?’ म्हणत गावसकरांनी चक्क पंचांना ऐकवले नियम

‘भारतीय संघ लढवय्या, पण हे लीड्स आहे कोलकाता नाही,’ इंग्लंडच्या माजी क्रिकेटरची चेतावणी

खराब फॉर्मात असताना पुजारावर टीका करणाऱ्यांना रोहितचे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘त्यांची स्मरणशक्ती कमकुवत’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---