22 नोव्हेंबर पासून इडन गार्डन, कोलकाता येथे भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा कसोटी सामना (2nd Test Match) पार सुरू होणार आहे. हा कसोटी सामना दिवस-रात्र कसोटी (Day-Night Match) सामना असणार आहे.
भारताचा हा पहिलाच दिवस – रात्र कसोटी सामना असल्याने हा सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ कोलकातामध्ये (Kolkata) आज(19 नोव्हेंबर) पोहोचला आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की कोलकात्याला पोहचल्यावर भारतीय खेळाडूंचे पारंपारिक पद्धतीने गळ्यात हार घालून स्वागत करण्यात आले.
#TeamIndia have arrived here in Kolkata for the #PinkBallTest#INDvBAN pic.twitter.com/fAoCdBM306
— BCCI (@BCCI) November 19, 2019
हा दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने (Pink Ball) खेळला जाणार आहे.
या ऐतिहासिक सामन्यासाठी भारतीय संघ आणि बांगलादेशच्या संघाने इंदोरमध्ये मागील दोन दिवस सराव आहे.
तसेच या सामन्यासाठी इडन गार्डन मध्ये क्रिकेट तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी रंगाने रंगले आहे. तसेच, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांच्या हस्ते या सामन्याचा शुभंकर(Mascots) ‘पिंकू-टिंकू’ (Pinku-Tinku)चे अनावरण करण्यात आले आहे. गांगुलीने ईडन गार्डनवर सामन्याचे तिकीट आणि शुभंकर बरोबर फोटो घेतले.
या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 22 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे.
रहाणेला पडत आहेत गुलाबी चेंडूने खेळण्याची स्वप्न; विराट, धवन काय म्हणत आहेत पहाच
वाचा- ???? https://t.co/bzs0E7vdvd????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #AjinkyaRahane— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019
या खेळाडूसाठी युवराज सिंग करणार शाहरुख खानला मेसेज
वाचा????https://t.co/hTx4lmKf43????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 19, 2019






