भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्याबद्दल अनेकदा असं बोललं जातं की तो खूप रागामध्ये असतो. परंतू जे त्याला जवळून ओळखतात त्यांचं मत वेगळं आहे. गंभीरचं बालपणीचं प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी त्याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. भारद्वाजनं गंभीरची खेळाबद्दलची आवड आणि त्यांची जिंकण्याची भूक याबद्दल सांगितलं आहे. भारद्वाजनं सांगितलं की, गौतम गंभीर (Gautam Gambhir) लहानपणापासून असाच आहे.
भारद्वाज म्हणाले की, गंभीरला अनेकदा चुकीचं समजलं जातं. त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की तो गर्विष्ठ आहे आणि त्याचं वागणं चांगलं नाही. मात्र, भारद्वाज म्हणाले की, गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा 12 वर्षांच्या मुलासारखा आहे, त्याला नेहमी जिंकायचं असतं आणि तो पराभव सहजासहजी पचवून घेत नाही.
माजी क्रिकेटर मनजोत कालरा याच्या यूट्यूब चॅनलशी बोलताना भारद्वाज म्हणाले की, “आजही तो एक शांत मुलगा आहे. त्याच्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही. तो 12 वर्षांच्या मुलासारखा आहे. लोकांना वाटतं की तो गर्विष्ठ आहे. पण त्याची जिंकण्याची वृत्ती आहे. नेट सरावानंतर मी त्याला सामन्यांना घेऊन जायचो आणि पराभवानंतर तो रडायचा. तेव्हाही त्याला हारणं आवडत नव्हतं. त्यामुळं त्याच्यासारखा खरा माणूस साहजिकच गंभीर असेल.
पुढे बोलताना संजय भारद्वाज म्हणाले की, “गौतम गंभीर (Gautam Gambhir) तांत्रिक बाबींमध्ये जाणार नाही. कारण या पातळीवर तांत्रिक सुधारणांची फारशी गरज नाही. तुम्ही तिथं आहात कारण तुम्ही खूप तांत्रिकदृष्ट्या चांगले आहात. गंभीर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवेल आणि स्वत:बद्दल फारसा आत्मविश्वास नसलेल्या खेळाडूंचा आत्मविश्वास देखील गंभीर वाढवेल, कारण हे त्याचं काम आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
T20 World Cup: सत्तापालटानंतर बांग्लादेशवर टांगती तलवार, टी20 विश्वचषकाचे यजमानपद धोक्यात
दिनेश कार्तिकचा यू-टर्न, लवकरच खेळणार टी20 मालिका, या संघात लागली वर्णी!
मैदानाऐवजी भारतीय खेळाडू माॅलमध्ये व्यस्त; श्रीलंकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची शाॅपिंग