जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ तयार दिसत आहेत. 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. उभय संघांतील ही लढत रोमांचक ठरण्याची अपेक्षा सर्वांनाच आहे. मात्र त्याचवेळी भारतीय संघासमोर मागील दहा वर्षांपासून असलेला दुष्काळ संपवण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. भारतीय संघाने मागील दहा वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. हे विजेतेपद जिंकल्यास रोहित कपिल देव व एमएस धोनी यांच्यानंतर आयसीसी विजेतेपद जिंकणारा तिसरा कर्णधार बनेल.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळेल. मागील अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताला पराभूत केलेले. आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा भारतीय संघाचा दुष्काळ मागील दहा वर्षांपासून सुरू आहे. भारतीय संघाने अखेरची आयसीसी ट्रॉफी चॅम्पियन ट्रॉफीच्या रूपात 2013 मध्ये जिंकली होती. तेव्हापासून भारताला एकाही आयसीसी स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यात यश आलेले नाही.
भारतीय संघाने 2014 टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, श्रीलंकेने भारताला अंतिम फेरी पराभूत केलेले. 2015 वनडे विश्वचषक व 2016 टी20 विश्वचषक स्पर्धांच्या उपांत्य फेरीत भारताला अनुक्रमे ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजने मात दिलेली. त्यानंतर 2017 मध्ये पाकिस्तानकडून भारताला दारुण पराभव पत्करावा लागलेला. तसेच 2019 वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ न्यूझीलंडकडून पराभूत झालेला. 2021 टी20 विश्वचषकात भारतीय संघ साखळी फेरीच्या पुढे जाऊ शकला नव्हता. तर, 2022 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताला दहा गड्यांनी मात दिलेली. अशाप्रकारे मागील आर्ट आयसीसी स्पर्धांमध्ये भारत येऊन जाऊ शकला नाही.
यावेळी इंग्लंडमध्ये हा सामना होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. कारण, प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला देखील त्यांच्या मनासारखी परिस्थिती मिळणार नाही. तसेच, भारतीय संघाची इंग्लंडमधील नजीकची कामगिरी दमदार राहिली आहे.
(Team India ICC Trophy Drought Since 2023 Hoping End In WTC Final 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये चॅलेंज लढतीत विदित गुजराथी, रौनक साधवानी यांना विजेतेपद
केएस भरतचा मोठा खुलासा, WTC फायनलसाठी धोनीकडून IPL मध्येच घेतल्या आहेत टिप्स