भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणारा तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या निर्णायक सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे मालिकेचा निकाल ठरवणारा हा सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. इंदौरची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते, मात्र सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. हे लक्षात घेत शुबमन गिलने प्रथम गोलंदाजीचा पर्याय निवडले असावे.
या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याची संघात पुनरागमन झाले आहे. डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करण्यासाठी अर्शदीपकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.
भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
बातमी अपडेट होत आहे.






