भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. यजमान संघ टी20 मालिकेत क्लीन स्वीपच्या जखमेतून अद्याप सावरलेला नाही. टी20 च्या तुलनेत श्रीलंकेला घरच्या मैदानावर पराभूत करणे टीम इंडियासाठी सोपे काम असणार नाही. संघाची आकडेवारी याची साक्ष देत आहे. श्रीलंकेने घरच्या वनडे सामन्यात टीम इंडियाला जबरदस्त झुंज दिली आहे.
देशांतर्गत एकदिवसीय सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर श्रीलंकेचा संघ भारतासोबत कडवी टक्कर दिले असल्याचे दिसते. श्रीलंकेच्या भूमीवर दोन्ही संघांमध्ये एकूण 66 एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 32 वेळा श्रीलंकेचा पराभव केला आहे, तर लंकेने 28 वेळा भारताचा पराभव केला आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही संघ 38 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 19 सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने 16 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास तर, टीम इंडियाचा श्रीलंकेवर दबदबा असल्याचे दिसते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 246 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने 142 सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने 73 सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये 2 सामने बरोबरीत, 17 अनिर्णित राहिले आणि 12 सामने अनिर्णित ठरले. आता टीम इंडिया ही संख्या वाढवते का किंवा श्रीलंका संघ टी 20 ची जखम भरून काढण्यात यशस्वी होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून यजमान संघासाठी वाईट बातमीचा भडीमार चालूच आहे. एकापाठोपाठ एक संघाचे वेगवान गोलंदाज जखमी होताना दिसले. मथिशा पाथिराना, मधुशंका यांच्यासह संघातील काही खेळाडू वनडे मालिकेपूर्वीच दुखापतीच्या जाळ्यात अडकले आहेत. याचा फायदा टीम इंडियाला या मालिकेत होऊ शकतो.
हेही वाचा-
चाहत्यांचा हार्टब्रेक! स्टार बॅडमिंटनपटूच्या हाती निराशा, सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न भंगले
आयपीएल 2025च्या मेगा लिलावात सीएसके धोनीला रिटेन करणार?
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेचं प्रोमोशन, मध्य रेल्वेत आता ऑफिसर म्हणून काम करणार!