सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेत भारतीय संघाकडून क्षेत्ररक्षण करताना अनेक चुका झाल्या. तसेच खेळाडूंनी अनेक झेलही सोडले. त्यामुळे भारतीय संघाच्या नावावर एक नकोसा असा विक्रम जमा झाला आहे.
भारतीय संघाने २०१० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल २३५ झेल सोडले आहेत. भारतीय संघ या काळात ३५९ सामने खेळला आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येक सामन्यात संघातील खेळाडूंनी एकतरी झेल सोडला आहे.
याच काळात भारतापेक्षा कमी सामने खेळूनही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी जास्त झेल सोडले आहेत. इंग्लंड संघाने ३४८ सामन्यांत ३१२ तर ऑस्ट्रेलिया संघाने ३४३ सामन्यात २४६ झेल सोडले आहेत.