भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. मागच्या वेळी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, यावर्षी भारतीय संघ आपला पहिला डब्ल्यूटीसी किताब जिंकण्यासाठी आतुर आहे. भारतीय संघाचे अनेक खेळाडू आयपीएल 2023 स्पर्धा संपण्यापूर्वीच इंग्लंडला पोहोचले आहेत. या खेळाडूंमध्ये एक नाव विराट कोहली याचेही आहे. आता विराटबाबत ऑस्ट्रेलियन दिग्गजाने मोठे विधान केले आहे.
विराटवर सर्वकाही अवलंबून
ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फलंदाज मायकल हसी (Michael Hussey) याचा विश्वास आहे की, जर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम सामना जिंकायचा असेल, तर विराट कोहली (Virat Kohli) याचे प्रदर्शन खूप महत्त्वाचे राहील. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फलंदाज म्हणाला की, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या विजयाच्या शक्यतेसाठी विराटव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचेही प्रदर्शन खूप महत्त्वाचे असेल.
मायकल हसी याने आयसीसीकडून बोलताना म्हटले की, “विराटव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूविषयी विचार करणे कठीण आहे. त्याने निश्चितरीत्या खेळाच्या प्रत्येक प्रकारात पुनरागमन केले आहे. त्याचे आणि रोहितचे फलंदाजी प्रदर्शन भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचे असेल.”
विराट पुन्हा खतरनाक फॉर्ममध्ये
विराट पुन्हा आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने नुकतेच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून सलग दोन शतके ठोकले होते. विराट त्याचा संघसहकारी मोहम्मद सिराज याच्यासोबत इंग्लंडला पोहोचला आहे. तो अंतिम सामन्यापूर्वी केंट क्रिकेट ग्राऊंडवर सराव करत आहे. भारताने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मालिकेत विजय मिळवला होता, पण हसीचा विश्वास आहे की, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पूर्णपणे वेगळा असेल.
तो म्हणाला की, “हा सामना इंग्लंडमध्ये खेळला जाईल आणि तेथील परिस्थिती भारताच्या तुलनेत खूपच वेगळ्या असतील. त्यामुळे मला वाटते की, वेगवान गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सची भूमिका महत्त्वाची असेल आणि जोश हेजलवूड पुन्हा फिट झाला, तर तो ऑस्ट्रेलियासाठी चांगली होईल.”
पुढे बोलताना हसी असेही म्हणाला की, “भारताकडेही चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांसारखे वेगवान गोलंदाज आहेत. तसेच, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांसारखे फिरकीपटू आहेत. हे जागतिक स्तरावरील आक्रमण आहे आणि ऑस्ट्रेलियाला त्यांचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करावे लागेल.”
हसीने या सामन्यात कोणत्याही संघाला विजयाचा दावेदार निवडले नाहीये. दबाव भारतावर असेल, कारण भारताने 2013नंतर आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकली नाहीये. (team india is dependent on cricketer virat kohli and rohit sharma in wtc final said mike hussey 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल
‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल