आशिया चषकाच्या (Asia Cup) 15 व्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सामन्यांचे आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले आहेत. सध्या या स्पर्धेचे सुपर फोरचे सामने सुरू आहेत. संयुक्त अमिराती येथे सुरू असलेल्या स्पर्धेत यजमान श्रीलंका संघ उत्तम कामगिरी करत आहे. त्यांनी मंगळवारी (6 सप्टेंबर) भारताचा 6 गड्यांनी पराभव केला. यानंतर आयसीसीने टी20 क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला देखील या खेळाचा फायदा झाला.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला मागे टाकत त्याचाच संघसहकारी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान 815 अंकासह पहिल्या स्थानावर आला आहे. यामुळे रिझवान हा आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा तिसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा ऐडन मार्करम व चौथ्या क्रमांकावर भारताचा सूर्यकुमार यादव आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान हा देखील पहिल्या पाचात समाविष्ट आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला या आशिया चषकात प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र, तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत होता. श्रीलंकेविरुद्ध त्याने मागील अपयश भरून काढत शानदार खेळ दाखवला. त्याने 42 चेंडूवर 5 चौकार व 4 षटकार ठोकत 71 धावा केल्या. याच खेळीचा फायदा त्याला झाला आणि तो चार स्थानांच्या फायद्यासह 13 व्या क्रमांकावर पोहोचला. विराट कोहली दोन डावातील चांगल्या प्रदर्शनानंतर 29 व्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजांच्या टी20 क्रमवारीत भारताचा रविचंद्रन अश्विन आठ स्थानांच्या फायद्यासह ५०व्या, अर्शदीप सिंग २८ स्थानांनी प्रगती करत ६२व्या, श्रीलंकेचा महिश तिक्षणा पाच स्थानांनी प्रगती करत आठव्या, अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान तीन स्थानांनी पुढे जात सहाव्या आणि मोहम्मद नबी दोन स्थानांच्या प्रगतीसह 32 व्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दीपक हुड्डाकडून गोलंदाजी का करून घेतली नाही?, कर्णधार रोहितने सांगितले कारण
भारतातील ‘या’ मैदानातील स्टँडला दिले भज्जी अन् युवीचं नाव! वाचा सविस्तर
नजरों से नजर मिली.. पंत नव्हे ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरसोबत उर्वशीचा भिडलाय टाका? तुम्हीही पाहा