पर्ल| दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्या बुधवारी (१९ जानेवारी) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना (First ODI) झाला. बोलँड पार्क स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी ४ बाद २९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला २६५ धावाच करता आल्या आणि भारताने ३१ धावांनी हा सामना गमावला. यासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या भल्यामोठ्या २९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ५० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर २६५ धावा करू शकला. भारताकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक ७९ धावा फटकावल्या. ८४ चेंडूंचा सामना करताना १० चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. त्याच्या साथीला विराट कोहली ६३ चेंडूत ५१ धावा करत बाद झाला. या दोघांव्यतिरिक्त शार्दुल ठाकूरने शेवटी चिवट झुंज दिली. परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. तो ५० धावांवर नाबाद राहिला.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, तरबेज शम्सी, ऍंडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर ऍडम मार्करम आणि केशव महाराज यांनीही एका विकेटचे योगदान दिले.
🚨 RESULT | #PROTEAS WON BY 31 RUNS
A commanding team performance with bat and ball sees Temba Bavuma's men take a 1-0 series lead in the #BetwayODISeries👏 #SAvIND #BePartOfIt | @Betway_India pic.twitter.com/sWZMz6e2rI
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 19, 2022
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेकडून दोन फलंदाजांनी शतके खेळी केली. त्यांचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि जानेमन मलान स्वस्तात माघारी परतले. तसेच ऍडम मार्करमही पदार्पण वेंकटेश अय्यरच्या हातून धावबाद झाला. परंतु कर्णधार टेम्बा बावुमा आणि रासी वॅन डर डूसेन यांनी शानदार द्विशतकी भागिदारी रचत संघाची धावसंख्या ३०० च्या जवळ नेली.
बावुमा वैयक्तिक १४३ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. तर डूसेन १२९ धावांवर नाबाद राहिला. ९६ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली.
भारताकडून या डावात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विननेही एका विकेटचे योगदान दिले. मात्र भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूरने सर्वांची निराशा करत एकही विकेट न घेता अनुक्रमे ६४ आणि ७२ धावा खर्च केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय गोलंदाजांची पिसं काढत दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचं खणखणीत शतक, केला ‘हा’ खास पराक्रम
कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये
हरियाणा स्टिलर्सची पुणेरी पलटणला करारी शिकस्त, धाकधूकीच्या सामन्यात ७ गुणांनी मारली बाजी
हेही पाहा-