मुंबई । भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने माजी कर्णधार एमएस धोनीचे जोरदार कौतुक करताना तो संघात असणे हे आमच्यासाठी मोठी संधी असल्याचे बोलले आहे.
“एमएस धोनीमध्ये अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. तो त्याच्या फिटनेसची काळजी घेतो. तो त्याचा आहार आणि शरीराकडे लक्ष देतो. विशेष म्हणजे संघात असताना तो विराट आणि अन्य खेळाडूंना मार्गदर्शन करतो. ” असे रहाणे म्हणाला.
“धोनीकडे कौशल्य आहेत आणि त्याचा अनुभव सगळ्या गोष्टीत दिसतो. त्याचमुळे तो संघात असणे हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्याने आम्हाला खूप काही शिकवले आहे आणि त्याकडे अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. ” असेही रहाणे आपल्या माजी कर्णधाराची स्तुती करताना म्हणाला.
सध्या अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तो कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. हा दौरा ५ जानेवारीपासून सुरु होत आहे.