मुंबई । भारतीय क्रिकेट संघाने आजच्या दिवशी 1974 साली आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 49 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय संघाने आपला पहिला वनडे सामना खेळला. एक वर्षाच्या नंतर भारतीय संघ वनडे विश्वचषकही खेळला. सुरुवातीच्या काळात भारतीय संघाला वनडेमध्ये जास्त यश मिळाले नव्हते.
अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. इंग्लंडविरुद्ध लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानावर पहिला वनडे सामने झाला. पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतास फलंदाजीस पाचारण केले. या सामन्यात भारताने 53.5 षटकात सर्वबाद 265 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 51.1 षटकात 6 गडय़ांच्या मोबदल्यात 266 धावा काढून विजय मिळवला होता.
भारताचा पहिल्या वनडे सामन्यातील संघ
सुनील गावसकर, सुधीर नाइक, अजीत वाडेकर (कर्णधार), गुंडप्पा विश्वनाथ, फारुख इंजीनियर (यष्टिरक्षक), ब्रिजेश पटेल, एकनाथ सोळकर, सैयद आबिद अली, मदन लाल, श्रीनिवास वेंकटराघवन आणि बिशन सिंग बेदी.
पहिला आंतरराष्ट्रीय वनडे सामना
5 जानेवारी 1971 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्नच्या मैदानावर पहिला वनडे सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना 40 षटकांचा खेळवण्यात आला. त्यावेळी एका षटकात आठ चेंडू टाकले जायचे. पहिल्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखून विजय मिळवला होता. पांढऱ्या जर्सीमध्ये हा सामना खेळवला गेला होता. त्यावेळीही वनडे क्रिकेटमध्ये लाल चेंडूचा वापर केला जात होता. वनडे क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात 60-60 षटकांचा सामना खेळवला जात होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कुलदीपने २०१८ला केलेल्या कामगिरीची बुमराहकडून पुनरावृत्ती, ४ वर्षांनंतर इंग्लंडच्या जखमेवर चोळलंय मीठ
आयर्लंडला हरवत न्यूझीलंडने रचलाय विश्वविक्रम! ‘असा’ कारनामा करणारा जगातील एकमेव संघ
‘विराट दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात करणार पुनरागमन?’ पहिल्या मॅचमध्ये मिळालेत महत्वाचे संकेत