आपला दुसरा टी20 विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. विजेतेपदाचे दावेदार असताना अशारीतीने पराभूत झाल्यामुळे भारतीय संघावर टीका होतेय. विश्वचषक पराभवाला 24 तास होण्याआधीच भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याची गच्छंती करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.
याच वर्षी जुलै महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावेळी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनवलेल्या मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जातेय. त्यांचा करार केवळ विश्वचषकापर्यंत होता. खेळाडूंना व्यस्त वेळापत्रक मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांची निवड केली गेली होती. विश्वचषकात भारतीय संघाला अपेक्षित यश न मिळाल्याने आता ते या पदावर कायम राहणार नाहीत. भारतीय संघाला 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. भारतीय संघ महत्त्वाच्या स्पर्धांच्या उपांत्य अथवा अंतिम फेरीत जाऊन पराभूत होत आहे.
पॅडी अप्टन हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे नाव म्हणून ओळखले जाते. दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी असलेल्या अप्टन यांनी यापूर्वी देखील भारतीय संघासह काम केले आहे. गॅरी कस्टर्न भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना अप्टन सहप्रशिक्षक म्हणून संघासोबत होते. भारतीय संघाने जिंकलेल्या 2011 विश्वचषकावेळी ते सपोर्ट स्टाफचा भाग होते.
सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांच्यासोबतही त्यांनी बराच काळ काम केले आहे. आयपीएलमध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्स व दिल्ली डेअरडेविल्स संघासाठी प्रशिक्षक म्हणून सोबत काम केलेले. सध्या अप्टन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक आहेत.
(Team India Mental Conditioning Coach Paddy Upton Resigned)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची पाठराखण केल्यानंतर सचिन होतोय ट्रोल; चाहते म्हणतायेत…
माजी इंग्लिश कर्णधाराची भारतावर सडकून टीका! म्हणाला, “एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांनी काय केलय?”