आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 आज म्हणजेच गुरुवारपासून (03 ऑक्टोबर) सुरू होत आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी दुबईत सामना रंगणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकली तर शफाली वर्मासोबत स्मृती मानधनाला सलामीची संधी मिळू शकते. टीम इंडियाचे बॉलिंग युनिटही खूप मजबूत आहे. यामध्ये रेणुका सिंगसोबत श्रेयंका पाटील किंवा सजना संजीवनला संधी मिळू शकते.
महिला टी20 विश्वचषकातील पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे. हा सामना शारजाह येथे गुरुवारी होणार आहे. तर भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. जे की उद्या 4 ऑक्टोबर रोजी होईल. या सामन्यात टीम इंडियाला कडवी टक्कर मिळू शकते. सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघात सुझी बेट्स, अमेलिया केर आणि ईडन कार्सनसारखे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना कदाचित भारतासाठी सोपा असणार नाही.
शफाली आणि मानधना यांच्यासोबत यास्तिका भाटियाला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. यास्तिका तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकते. तर कर्णधार हरमनप्रीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकते. याशिवाय जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि पूजा वस्त्राकर यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये आशा शोभना किंवा श्रेयंकाचा समावेश करू शकते. न्यूझीलंडविरुद्ध रेणुका सिंग महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
यावेळी बांग्लादेशमध्ये महिला टी20 विश्वचषक 2024 चे आयोजन करण्यात येणार होते. मात्र त्याचे ठिकाण बदलण्यात आले. आता सर्व सामने यूएईमध्ये खेळवले जातील.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – शफाली वर्मा, स्मृती मानधना, यस्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, राधा यादव/सजना सजीवन, आशा शोभना/श्रेयंका पाटील, रेणुका सिंग
हेही वाचा-
ऋतुराज गायकवाडची फ्लॉप कामगिरी सुरूच, पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाने दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता
Irani cup; सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
‘पुन्हा दुखापती’ झाल्याच्या अफवांवर मोहम्मद शमीचा खुलासा, म्हणाला, “खोट्या….”