जगभरात सर्वाधिक क्रिकेट स्टेडियम असलेला देश म्हणून भारताला ओळखले जाते. भारतात कसोटी क्रिकेटची तब्बल २९ मैदानं किंवा स्टेडियम आहेत. यातील अनेक स्टेडियमवर आता सामने होतं नाहीत. परंतु यापुर्वी तेथे सामने झालेले आहेत.
जगात आयर्लंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, भारत, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे, वेस्ट इंडिज या १२ देशांनी व आयसीसी विश्वएकादश अशा एकूण १३ संघांनी कसोटी क्रिकेट खेळले आहेत. Team India never played test match on neutral test venue .
कसोटी क्रिकेटमध्ये कोणताही देश एकतर मायदेशात किंवा यजमान संघाच्या देशात सामने खेळतो. शक्यतो त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामने होतं नाहीत. तरीही काही देश हे वेगवेगळ्या कारणांमुळे त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळतात.
पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी परदेशी संघ येत नसल्याने हा देश दुबईत कसोटी सामने खेळतो. त्यामुळे येथे पाकिस्तान यजमान देश असतो तर परदेशी संघ हे पाहुणे संघ असतात. अफगाणिस्तान देशात कसोटी दर्जाचे मैदान नसल्याने तो देश आयोजीत करत असलेले सर्व सामने भारतात होतात. त्यामुळे आयर्लंडसारख्या देशालाही भारतात कसोटी सामना हा अफगाणिस्तानविरुद्ध खेळावा लागला.
परंतु वरिल १३ संघांमध्ये केवळ ४ संघ असे आहेत जे त्रयस्थ ठिकाणी कधीही कसोटी सामना खेळले नाहीत. त्यात भारत, आयसीसी विश्वएकादश, झिंबाब्वे व बांगलादेश या संघाचा समावेश होतो. परंतु आयसीसी कसोटी चॅंम्पियनशीपच्या जर अंतिम फेरीत भारत गेला तर मात्र भारताला त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळायला मिळु शकतो.
त्रयस्थ ठिकाणी सर्वाधिक सामने खेळणाऱ्या देशांत पाकिस्तान (३९), ऑस्ट्रेलिया (१२) व श्रीलंका (९) यांचा समावेश होतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कसोटी पदार्पणात भारताविरुद्ध भारतात शतक करणारे ५ खेळाडू
-भारतात कसोटीत सुप्पर डुप्पर फ्लाॅप ठरलेले ५ महान क्रिकेटर
-४ कारणं ज्यामुळे पृथ्वी शाॅ कधीच नाही होऊ शकत सचिन