क्रिकेट विश्वात सर्वाधिक वनडे सामने खेळणारा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारताने १९७४ ते २०२० या काळात तब्बल ९८७ वनडे सामने खेळले आहेत. या वर्षी १ हजार वनडे सामने खेळणारा पहिला देश होण्याची संधी टीम इंडियाला आहे.
सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या देशांत भारतानंतर ऑस्ट्रेलिया (९४९), पाकिस्तान (९२७) व श्रीलंका (८५२) या देशांचा नंबर लागतो. कसोटीत इंग्लंड या संघाने १ हजार कसोटी सामन्यांचा टप्पा पार केला आहे. Team played most ODIs on neutral venues.
असे असले तरी त्रयस्थ देशांत सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा विक्रम मात्र पाकिस्तान देशाच्या नावावर आहे. पाकिस्तानने त्रयस्थ ठिकाणी तब्बल ४०१ सामने खेळले आहेत. भारताने त्रयस्थ ठिकाणी २९९ सामने खेळले आहेत.
भारतीय संघाने खेळलेल्या एकूण ९८७ वनडेपैकी भारतात ३४२, त्रयस्थ देशांत २९९ तर यजमान संघाच्या देशांत ३४६ वनडे सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.
पाकिस्तान संघाने ९२७ पैकी ४०१ सामने त्रयस्थ ठिकाणी, ३४५ सामने यजमान संघाच्या देशांत तर १८१ वनडे सामने मायदेशात खेळले आहेत. याला कारण म्हणजे गेली अनेक वर्ष पाकिस्तानात कोणत्याही देशाने वनडे सामने खेळले नाहीत. नाहीतर त्रयस्थ ठिकाणी सामने खेळण्याचा विक्रम नक्कीच भारताच्या नावावर असता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतात वनडेत अतिशय खराब कामगिरी केलेले ५ दिग्गज क्रिकेटर्स