कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत भारतातील सर्वात मोठी टी२० लीग आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. परंतु आयपीएलसाठी अनेक देश उत्सुक आहेत. त्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयपीएलचे आयोजन आमच्या देशात करण्याची ऑफर भारताला दिली आहे.
श्रीलंका क्रिकेटचे (Sri Lanka Cricket Board) अध्यक्ष शमी सिल्वा (Shami Silve) यांनी कोलंबो येथे सांगितले की, “असे वाटते की श्रीलंका भारताच्या अगोदर कोरोना व्हायरसवर नियंत्रित मिळवेल. तसेच कोरोना व्हायरसही भारताच्या पहिले संपुष्टात येईल. जर असे झाले तर आम्ही आयपीएलचे आयोजन करू शकतो. आम्ही लवकरच याविषयी बीसीसीआयला एक पत्र लिहिणार आहोत.”
बीसीसीआयचे सचिव जय शाहने (Jay Shah) एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा आमची प्राथमिकता असल्याचे सांंगितले आहे. ज्या व्यक्तीचा या खेळामध्ये समावेश आहे, त्याची जबाबदारी आमची प्राथमिकता आहे. फ्रंचायझी मालक, ब्रॉडकास्टर आणि बीसीसीआयबरोबर सर्वच भागधारकांचे असे म्हणणे आहे की, जेव्हा लोक पूर्णपणे सुरक्षित असतील, तेव्हाच आयपीएल २०२०चे आयोजन होईल.
शाह पुढे म्हणाले की, “बीसीसीआय सतत परिस्थितीवर लक्ष देऊन आहे. त्याचबरोबर आयपीएलचे आयोजन केव्हा करता येईल, हेदेखील पाहिले जाणार आहे.”
एका वृत्तानुसार, जर आयपीएलचे आयोजन झाले नाही तर या स्पर्धेला ५,००० ते ७,५०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या आयोजनावर अनेक दिग्गजांनी वेगवेगळे सल्ले दिले होते. यामध्ये काहींनी आयपीएलचे सामने कमी करण्याचेही सांगितले होते.
आयपीएल २०२०च्या १३ व्या मोसमाचे आयोजन यापूर्वी २९ मार्चला होणार होते. परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे ते १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले. परंतु लॉकडाऊन वाढल्यानंतर आयपीएल (IPL 2020) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. Sri Lanka offers to host IPL 2020 amid COVID-19 crisis
ट्रेंडिंग घडामोडी-
-४ कारणं ज्यामुळे पृथ्वी शाॅ कधीच नाही होऊ शकत सचिन
-वनडेत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे ५ क्रिकेटर्स
-मोठ्या खेळाडूने सांगितले भारताच्या सर्वात बेस्ट क्षेत्ररक्षकाचे नाव