मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाची जर्सी बदलणार असल्याची चर्चा सुरू होती. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व अन्य खेळाडूंनी याचा प्रोमो देखील शूट केला होता. त्यानंतर आता रविवारी (18 सप्टेंबर) या जर्सीच्या अनावरण करण्यात आले आहे. जर्सीची निर्माते असलेल्या एमपीएल स्पोर्ट्सने इंस्टाग्राम लाईव्हद्वारे मुंबईतील एका कार्यक्रमात ही जर्सी लॉन्च केली.
https://www.instagram.com/p/CiptootIarN/?igshid=YzA2ZDJiZGQ=
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्वचषकाआधी भारतीय संघ आपली नवी जर्सी लॉन्च करणार होता. सर्व संघ नियमितपणे प्रत्येक विश्वचषकाआधी नवी जर्सी बनवत असतात. 2020 पासून भारतीय संघाचे जर्सी स्पॉन्सर एमपीएल स्पोर्ट्स आहेत. त्यांनीच ही नवी जर्सी बनवली. ही जर्सी अधिकतर आकाशी निळ्या रंगाची असून, 2020 नंतर प्रथमच भारतीय संघ अशी जर्सी परिधान करेल. तसेच खांद्यावर गडद निळ्या रंगाचा भाग राहील.