भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ११ नोव्हेंबरला दुबईतून सिडनी येथे रवाना झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यातील वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघ नवी जर्सी परिधान करणार असल्याची सध्या चर्चा आहे.
आऊटलूकने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेसाठी सत्तरच्या दशकातून प्रेरित असलेली ‘रेट्रो’ थीम जर्सी घालेल. या नव्या जर्सीचा रंग गडद निळा (नेवी ब्ल्यू) असेल. तसेच या जर्सीवर एमपीएल स्पोर्ट्सचे नावही असेल. मागील महिन्यातच बीसीसीआयने एमपीएलला नवे किट स्पॉन्सर्स म्हणून घोषित केले होते.
एमपीएलबरोबर बीसीसीआयने १२० कोटी रुपयांचा अधिक महसूल वाटा असा तीन वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे आता नाईकीची जागा एमपीएल घेणार आहे.
असे असले तरी अजून बीसीसीआयने नव्या जर्सीबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
https://twitter.com/man4_cricket/status/1326579325869596672
https://twitter.com/imRohit_SN/status/1326696682818400259
ऑस्ट्रेलिया देखील घालणार नवी जर्सी
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेवेळी ऑस्ट्रेलिया संघ खास डिजाईन असलेली जर्सी घालून मैदानावर उतरणार आहे. क्रिकेटजगतात स्वदेशी ऑस्ट्रेलियाई लोकांच्या भूमिकेला ओळख मिळवून देणे आणि त्यांना प्रोत्साहित करते, हा यामागचा उद्देश आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (११ नोव्हेंबर) खास डिजाईन असलेल्या जर्सीचे अनावरण केले आहे. ही जर्सी ASICS आणि दोन स्वदेशी महिलांच्या सहयोगाने बनवण्यात आली आहे. फियोना क्लार्क आणि कर्टन हाजेन ही त्या स्वदेशी महिलांची नावे आहेत. फियोना क्लार्क या दिग्गज क्रिकेटपटू मास्किटो यांच्या वंशज आहेत. मास्किटो हे १८६८ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणारे ऑस्ट्रेलिया संघाचे पहिले स्वदेशी क्रिकेटपटू होते.
https://twitter.com/CricketAus/status/1326405724180803592
असा असेल ऑस्ट्रेलिया दौरा –
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा खेळण्याआधी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये राहणार आहे. त्यानंतर क्रिकेट सामन्यांना सुरुवात होईल २७ नोव्हेंबरपासून सिडनी येथे वनडे मालिका सुरु होईल. त्यानंतर ४ ते ८ डिसेंबरदरम्यात टी२० मालिका खेळली जाणार आहे. तर १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा सामना ऍडलेडला खेळला जाणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक
पहिला वनडे – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वनडे – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वनडे -०२ डिसेंबर – कॅनबेरा
पहिला टी२० – ०४ डिसेंबर – कॅनबेरा
दुसरा टी२० – ०६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी२० – ०८ डिसेंबर – सिडनी
पहिला कसोटी सामना – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर – ऍडिलेड
दुसरा कसोटी सामना – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ०७ जानेवारी ते ११ जानेवारी – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ जानेवारी ते १९ जानेवारी – ब्रिस्बेन
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे रोहित शर्मा टीम इंडियासह गेला नाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
….म्हणून इयत्ता नववीच्या वर्गातच रोहित बनला होता शालेय संघाचा कर्णधार
हम तैयार है..! बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचे खास फोटो प्रसिद्ध
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान
रामराम आणि पुन्हा भेटू! आयपीएल २०२० ला अलविदा करत असताना एक नजर या स्पर्धेतील महत्वाच्या घटनांवर






