भारताच्या टी20 संघाचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटले आहे की, त्यांच्यासाठी क्रिकेट हे जीवन नसून जीवनाचा एक भाग आहे आणि या खेळाने त्यांना हे शिकवले आहे. सूर्यकुमार यादव सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून शनिवारपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होत आहे.
या मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादवने बीसीसीआयच्या मीडिया टीमशी कर्णधारपद आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगितले आहे. या संभाषणाचा व्हिडिओ बीसीसीआयच्या ‘X’ हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सूर्याने स्पष्टपणे म्हटले आहे की, क्रिकेटने त्याला जीवनात संतुलन राखायला शिकवले आहे.
𝗦𝘂𝗿𝘆𝗮𝗸𝘂𝗺𝗮𝗿 𝗬𝗮𝗱𝗮𝘃 𝘁𝗮𝗸𝗲𝘀 𝗴𝘂𝗮𝗿𝗱 𝗮𝘀 #𝗧𝗲𝗮𝗺𝗜𝗻𝗱𝗶𝗮‘𝘀 𝗧𝟮𝟬𝗜 𝗰𝗮𝗽𝘁𝗮𝗶𝗻! 🧢#SLvIND | @surya_14kumar pic.twitter.com/KmWz84jZnP
— BCCI (@BCCI) July 26, 2024
क्रिकेटने मला नेहमी नम्र राहण्यास शिकवले आहे. आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे असे सूर्याने म्हटले आहे. सूर्या म्हणाला, “जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट साध्य करत नसाल तेव्हा तुम्ही किती विनम्र राहता. क्रिकेट मैदानात तुम्ही जे काही साध्य करता ते तुम्ही तेथेच सोडायला पाहिजे आणि त्यागोषटी मैदानाबाहेर नाही नेल्या पाहिजे.”
सूर्या पुढे बोलताना म्हणाला की, क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही जे काही करत आहात ते तुमचे आयुष्य नसून जीवनाचा एक भाग आहे. तो म्हणाला, “हे तुमचे जीवन नाही, हा तुमच्या जीवनाचा एक भाग आहे. त्यामुळे असे नाही की जेव्हा तुम्ही चांगले करत असाल तेव्हा तुम्ही शीर्षस्थानी असाल आणि जेव्हा तुम्ही चांगले करत नसाल तेव्हा तुम्ही जामिनीवर राहाल. ही गोष्ट होईल. तुम्ही खरचं मानापासून क्रिकेटमध्ये काही गोष्टी करताल तर नक्कीच तुमच्यासोबतही चांगलेच घडेल.
हेही वाचा-
“विराट कोहली कर्णधार नसून सुद्धा तो…”, बुमराहने सांगितली टीम इंडियातील आतली गोष्ट
“काही गोष्टी नियंत्रणाबाहेर..”, जसप्रीत बुमराहने मुंबईत ‘रोहित-हार्दिकच्या’ कर्णधारपदाचा वादवार दिली प्रतिक्रिया
‘आम्ही चांगले लोक आहोत…’, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी पाकिस्तान क्रिकेटपटूचे अनोखे विधान