2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संमिश्र राहिलं. टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाला. टीम इंडियानं तब्बल 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. यापूर्वी 2012 मध्ये इंग्लंडनं भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघानं घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या.
यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील भारतीय संघाची कामगिरी फारशी खास राहिली नाही. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, 2024 या वर्षात भारतीय संघानं एकही वनडे सामना जिंकला नाही! यापूर्वी 1979 साली टीम इंडियाला एका वर्षात एकही वनडे सामना जिंकता आला नव्हता. आता 45 वर्षांनंतर पुन्हा एकदा असं घडलं आहे.
टीम इंडियानं यावर्षी एकूण 3 एकदिवसीय सामने खेळले. भारतीय संघ ऑगस्टमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. मालिकेतील पहिला सामना टाय झाला होता. त्यानंतर श्रीलंकेनं पुढचे दोन्ही सामने जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घातली. श्रीलंकेनं दुसऱ्या सामन्यात 32 धावांनी विजय मिळवला. तर तिसरा सामन्यात त्यांनी भारतीय संघाचा 110 धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे, या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे स्टार भारतीय खेळाडू खेळले होते.
आता यावर्षी भारतीय संघाला आणखी एकही वनडे मालिका खेळायची नाही. त्यामुळे यावर्षी भारताच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकही विजय असणार नाही. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला नोव्हेंबरमध्ये 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं आहे.
हेही वाचा –
काय करावं ते सुचेना! भारताच्या दिग्गज फलंदाजांनी चक्क ‘पार्ट टाईम क्रिकेटर’समोर गुडघे टेकले
“जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात यावं”, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला
WTC पॉइंट टेबलमधील भारताचे वर्चस्व धोक्यात, आता आणखी एक सामना गमावल्यास…