भारतीय खेळाडू शिखर धवन (Shikhar Dhawan) बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. या स्टार सलामीवीराला 2022पासून भारताकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे, जिथं एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. याआधी टी20 मालिकेत भारतानं श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला. ही मालिका सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली जिंकली होती, तर भारत एकदिवसीय मालिका रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळत आहे. दरम्यान, शिखर धवनला त्याच्या खास जोडीदाराची आठवण झाली आहे.
खरं तर, इथं आपण त्याच्या ओपनिंग पार्टनरबद्दल बोलत आहोत. फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं धवननं त्याचा सलामीवीर रोहित शर्माची (Rohit Sharma) आठवण काढली आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना तो रोहित शर्मा आणि त्याच्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलला. रोहित आणि शिखर धवन ही सलामीची जोडी क्रिकेट विश्वातील सर्वाधिक धावा करणाऱ्या जोडींपैकी एक आहे. या दोघांनी सलामीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
धवन म्हणाला, “मी त्याच्यासोबत 8-10 वर्षांपासून सलामी दिली आहे, त्यामुळे माझे त्याच्याशी घट्ट नाते आहे. तो एक रत्न आहे. रोहितसोबत फलंदाजी करतानाचं मनोरंजक क्षण शेअर करताना धवन म्हणाला, “जेव्हा मी खेळपट्टीवर ‘पुट्ट जट्टान दे बुलाओंडे बकरे’ हे गाणे म्हणायचे तेव्हा त्याला ते खूप आवडायचे. त्यामुळे तो माझ्याकडे बघायचा आणि मग तेच गाणं म्हणायचा. हा एक क्षण आहे ज्याची वारंवार पुनरावृत्ती होते. त्याला त्या गाण्याच्या काही ओळी आठवल्या ज्या तो गाायचा आणि मग हसायचा.”
This opening duo! ????????????????@SDhawan25 shares his experiences of opening with @ImRo45, highlighting their unique bond and how they’ve celebrated one another over the years! ❤️#FriendshipDay pic.twitter.com/oJlxIPkxwz
— Star Sports (@StarSportsIndia) August 4, 2024
धवनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 34 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 40.61च्या सरासरीनं 2,315 धावा ठोकल्या आहेत. यागरम्यान त्यानं 5 अर्धशतक आणि 7 शतक आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 190 राहिली आहे. तर 167 सामन्यांमध्ये त्यानं 6,793 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 39 अर्धशतक आणि 17 शतक लगावले आहेत. तर 68 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 1,759 धावा केल्या. त्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 92 राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितचे श्रीलंकेविरुद्ध झंझावाती अर्धशतक, ‘या’ विक्रमात माजी गुरू द्रविडला सोडले मागे
व्वा रे रोहित शर्मा! निपुण गोलंदाजाप्रमाणे केली बॉलिंग, 12 चेंडूत साधा एक चौकारही दिला नाही
खेळाडू टी-शर्ट काढून नाचले, समालोचकांना अश्रू आवरेना! भारताच्या ऐतिहासिक विजयानंतरचं सेलिब्रेशन






