---Advertisement---

व्वा रे रोहित शर्मा! निपुण गोलंदाजाप्रमाणे केली बॉलिंग, 12 चेंडूत साधा एक चौकारही दिला नाही

On: रविवार, ऑगस्ट 4, 2024 7:55 PM
rohit sharma bowling
---Advertisement---

Rohit Sharma bowling :- भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघ रविवारी (4 ऑगस्ट) दुसऱ्या वनडे सामन्यात आमनेसामने आले. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) वेगळ्या भूमिकेत दिसला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहित गोलंदाजीसाठी आला होता. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दोन षटके टाकली.

रोहितने दुसऱ्या वनडे सामन्यात 39 वी आणि 41वी षटके टाकली. रोहितच्या दोन षटकांत एकूण 11 धावा निघाल्या. रोहितने पहिल्या षटकात सहा आणि दुसऱ्या षटकात पाच धावा दिल्या. रोहितच्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी सावध फलंदाजी केली आणि त्याच्या चेंडूवर एकही चौकार लागला नाही. एकेरी-दुहेरी धावांसह फलंदाजांनी धावा केल्या.

रोहित शर्माने वनडे सामन्यांच्या 39 डावांमध्ये गोलंदाजी केली असून, त्यात त्याच्या नावावर नऊ विकेट्स आहेत. त्याने वनडेमध्ये 5.24 इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये हॅटट्रिकही घेतली आहे. रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये 15 विकेट आहेत. त्याने कसोटीत दोन आणि टी20 मध्ये एक विकेट घेतली आहे.

दुसऱ्या सामन्याचा विचार केल्यास, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 9 गडी गमावून 240 धावा केल्या. सलामीवीर अविष्का फर्नांडोने 62 चेंडूत 40 धावांची खेळी केली. कामिंदू मेंडिसने देखील 40 धावा केल्या. यष्टीरक्षक कुसल मेंडिसने 30 धावांची खेळी खेळली. तर, दुनिथ वेल्लालागेने 39 धावांची खेळी केली. भारतासाठी गोलंदाजी करताना फिरकीपटू वाॅशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दिग्गज फिरकीपटू कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या. अष्टपैलू अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजने 1-1 विकेट मिळवली.

उभय संघामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात निकाल लागला नव्हता. भारतीय संघाला विजयासाठी दिलेले 231 धावांचे आव्हान पूर्ण करता आले नाही. अखेरच्या दोन चेंडूवर दोन गडी बाद झाल्याने सामना बरोबरीत सुटला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

कॅच घेतल्यानंतर केला बिहू डान्स, विराट कोहलीचं अनोखं सेलिब्रेशन तुफान व्हायरल
IND vs SL निर्णायक सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 241 धावांचं आव्हान
IND vs SL पहिल्या चेंडूवर विकेट घेवून मोहम्मह सिराजनं रचला इतिहास..!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---