श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) शानदार गोलंदाजी केली. रविवारी (4 ऑगस्ट) कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सिराजनं जबरदस्त कामगिरी केली. तत्पूर्वी या मैदानावर शुक्रवारी पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. हा सामना जिंकणाऱ्या संघाला 1-0 अशी अभेद्य आघाडी मिळेल.
सिराजनं श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांकाचं पहिल्याच चेंडूवर मानसिक संतुलन बिघडवून टाकलं. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर सिराजनं त्याची विकेट घेतली. त्यानं निसांकाला यष्टिरक्षक केएल राहुलच्या (KL Rahul) हातात झेलबाद केलं. निसांका त्याचा चेंडू समजू शकला नाही. सिराजच्या इनवर्ड अँगल बॉलनं त्याला त्रास दिला. त्याला चेंडू समजेल तोपर्यंत चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठाला लागला होता. राहुलनं विकेटच्या मागे कोणतीही चूक केली नाही आणि उत्कृष्ट झेल घेतला.
सिराजनं पहिल्याच चेंडूवर विकेट घेत एका खास रेकाॅर्डमध्ये आपले नाव नोंदवले. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी झहीर खान आणि प्रवीण कुमार यांनी ही कामगिरी केली होती. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर 2002 मध्ये झहीरनं सनथ जयसूर्याला पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. तर 2009 मध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर त्यानं उपुल थरंगाला बाद केलं. प्रवीण कुमारनं 2010 मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानं थरंगाला डंबुलामध्ये बाद केलं होतं. त्यांच्यानंतर आता सिराजनं आता पाथुम निसांकाला कोलंबोच्या मैदानावर पहिल्याच चेंडूवर बाद करत अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका- चरिथ असालंका (कर्णधार) पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला धनाजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे
महत्त्वाच्या बातम्या-
रेड कार्ड, मैदानावर 10 खेळाडू; तरीही हार मानली नाही! ‘ग्रेट वॉल’ श्रीजेशचा पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराक्रम
इतिहास घडला! भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री, पेनल्टी शूटआऊटमध्ये मिळवला शानदार विजय
महिला प्रीमियर लीगमध्ये होणार सीएसकेची एंट्री? लवकरच घेतला जाईल मोठा निर्णय