भारताचा 21 सदस्यीय नेमबाजी संघ ऑलिम्पिकमधील 12 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. तत्तपूर्वी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा शुक्रवार, 26 जुलै रोजी थाटात पार पडला. मात्र, भारताने एक दिवस आधी म्हणजेच 25 जुलैपासून मोहीम सुरू केली होती. पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात भारताने तिरंदाजीने केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्घाटन सोहळ्यामुळे भारतीय खेळाडूंनी कोणत्याही खेळात सहभाग घेतला नाही. आता आज म्हणजेच शनिवार 27 जुलै रोजी भारतीय खेळाडू पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहेत.
आज शनिवारी (27 जुलै) भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिले पदक मिळू शकते. आज भारतीय खेळाडू अनेक खेळांमध्ये भाग घेतील, ज्यामध्ये नेमबाजीला खूप महत्त्व असणार आहे. 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजीतही आज पदक फेरी खेळली जाणार आहे. या मिश्र संघात संदीप सिंग, अर्जुन बबुता, इलावेनिल वालारिवन आणि रमिता जिंदाल हे ॲक्शन करताना दिसणार आहेत.
पहिल्यांदा 10 मीटर एअर रायफल मिश्र संघाच्या पात्रता फेरी होतील. पात्रता फेरी दुपारी 12.30 वाजता सुरू होईल. त्यानंतर पात्रता फेरीत पात्र ठरलेल्यांची पदक फेरी दुपारी 2 वाजता खेळली जाईल. आश्या स्थितीत 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला आज पहिले पदक मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पहिल्याच दिवशी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात संदीप सिंग-इलावेनिल वलारिवन, अर्जुन बबुता-रमिता जिंदाल या जोड्यांना आपला नेम अचूक साधावा लागणार आहे. त्यांनी पदकाची कमाई केल्यास अन्य भारतीय नेमबाजांचाही आत्मविश्वास उंचावेल.
आज (27 जुलै) ऑलिम्पिकमधील भारताचे हे संपूर्ण वेळापत्रक
बॅडमिंटन: पुरुष एकेरी गट सामना – लक्ष्य सेन विरुद्ध केविन कॉर्डन (ग्वाटेमाला) ( सायंकाळी 7.10 वा.)
पुरुष दुहेरी गट सामना – सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध लुकास कॉर्वे आणि रोनन लाबर (फ्रान्स) (रात्री 8 वा.)
महिला दुहेरी गटातील सामना- अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो विरुद्ध किम सो येओंग आणि काँग ही योंग (कोरिया) (रात्री 11:50 वा.)
नेमबाजी: 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पात्रता, संदीप सिंग-लावेनिल वालारिवन, अर्जुन बबुता -रमिता जिंदाल (दुपारी 12:30 वा.)
10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक पदक फेरी (पात्रतेनुसार) (दुपारी 2 वा.)
10 मीटर एअर पिस्तूल पुरुष पात्रता – अर्जुन सिंग चीमा आणि सरबज्योत सिंग (दुपारी 2 वा.)
10 मीटर एअर पिस्तूल महिला पात्रता – मनू भाकर आणि रिदम सांगवान (दुपारी 4 वा.)
हॉकी: पूल ब सामना- भारत विरुद्ध न्यूझीलंड (रात्री 9 वा.)
रोइंग: पुरुष एकल स्कल्स: पनवार बलराज (दुपारी 12:30 वा.)
टेबल टेनिस: पुरुष एकेरी पहिली फेरी – हरमीत देसाई विरुद्ध झैद अबो (येमन) (सायं 7.15 वा.)
टेनिस: पुरुष एकेरी पहिली फेरी – एन श्रीराम बालाजी-रोहन बोपण्णा विरुद्ध फॅबियन रेबोल आणि एडवर्ड रॉजर-व्हॅसेलिन – (दुपारी 3:30 वा.)
हेही वाचा-
IND vs SL: नव्या पर्वाला होणार सुरुवात; या कारणांमुळे टी20 मालिका ठरणार खास!
महिला आशिया कप 2024: श्रीलंकेची फायनलमध्ये थाटात एंट्री; उपांत्य फेरीत पाकिस्तानला पाजलं पाणी
“तू खालच्या दर्जाचा माणूस…”, हरभजनवर टीका करताना पाकिस्तानी खेळाडूची जीभ घसरली