भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) यांच्या दरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरुवात होत आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानल्या जात असलेल्या या मालिकेत विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शर्थ करतील. या पहिल्या सामन्यात उतरण्याआधी यजमान भारतीय संघाने फोटोशूट त्यामध्ये खेळाडू मस्ती करताना दिसून आले.
नागपूर कसोटीआधी भारताचे सर्व खेळाडू फोटोशूटसाठी एकत्र झालेले दिसले. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी प्रथम फोटोशूट केले. पुनरागमन करत असलेला रवींद्र जडेजा देखील यावेळी दिसून आला. तसेच, ईशान किशन व सूर्यकुमार यादव प्रथमच भारतीय संघाच्या पांढऱ्या जर्सीत दिसले.
Lights 💡
Camera 📷
Action ⏳🎥 Snippets from #TeamIndia's headshots session ahead of the #INDvAUS Test series! 👌 👌 pic.twitter.com/sQ6QIxSLjm
— BCCI (@BCCI) February 7, 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथे पार पडेल.. त्यानंतर दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान खेळला जाईल. याव्यतिरिक्त तिसऱ्या कसोटी सामन्यात उभय संघ धर्मशाला येथे 1 ते 5 मार्चदरम्यान भिडतील. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे 9 ते 13 मार्चदरम्यान पार पडेल. या मालिकेत भारतीय संघाने 2-0 असा विजय मिळवल्यास ते कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचतील. तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील संघाची जागा देखील नक्की होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(Team India Photoshoot Ahead Border-Gavaskar Trophy Against Australia)