---Advertisement---

काय सांगता! रोहित-विराट नाही खेळणार आयपीएलचा पहिला सामना?, वाचा कारण

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 7:08 PM
---Advertisement---

आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होत आहे. कोरोना महामारीमुळे हा हंगाम देखील बंद दाराआड विनाप्रेक्षक खेळविण्यात येईल. मात्र, हंगाम सुरु होण्याआधी भारतीय खेळाडूंसमोर लोढा समितीच्या एका शिफारसीमुळे अडचण निर्माण झाली आहे. बीसीसीआय या विषयावर काय निर्णय घेईल? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

काय आहे प्रकरण
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर जस्टीस लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने क्रिकेट मंडळ पारदर्शकता यावी. तसेच, काही गोष्टींचे योग्य नियमन करण्यासाठी काही शिफारशी सुचविल्या होत्या. त्यामध्ये आयपीएल व आंतरराष्ट्रीय मालिका यांच्यादरम्यान कमीतकमी १५ दिवसांचा अवधी असावा अशी अट घालण्यात आली होती.

मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका २८ मार्च रोजी संपन्न होत आहे. आयपीएल चौदावा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होत असल्याने आयपीएल व आंतरराष्ट्रीय मालिका यांच्यातील अवधी केवळ १२ दिवसांचा राहत आहे. लोढा समितीची १५ दिवसांची अट मात्र यामुळे पूर्ण होत नाही. आता या प्रकरणावर बीसीसीआय काय भूमिका घेईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

यापूर्वी काय झाले होते
लोढा समितीने सुचविलेली ही अट आत्तापर्यंत म्हणावी तशी पाळली गेली नाही. मागील वर्षी कोविड-१९ मुळे कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका खेळली गेली नव्हती. त्यामुळे सर्व खेळाडू पूर्ण विश्रांती घेऊन आयपीएलमध्ये सहभागी झालेले. २०१९ आयपीएल वेळी खेळाडूंना ९ दिवसांची विश्रांती मिळालेली.

बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, देशात सार्वत्रिक निवडणुका असल्याने आम्हाला अशाप्रकारे लवकर स्पर्धा आयोजित करावी लागली होती. २०१८ मध्ये या नियमाचे पालन केले गेले होते. मात्र, २०१७ मध्ये या शिफारशीला दाद दिली गेली नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या-

दे घुमा के! दुसऱ्या वनडेत रिषभ पंतचे ७ खणखणीत षटकार, पटाकावलं दुसरं स्थान

लांब केस, पिवळा चष्मा; युवराज सिंगच्या रॉकस्टार लुकवर EX गर्लफ्रेंड फिदा, ‘अशी’ दिली रिऍक्शन

दिल्ली कॅपिटल्सला मिळणार नवा कर्णधार; ‘या’ खेळाडूचे नाव नेतृत्वासाठी आघाडीवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---