टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताने पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली आहे. 5 जून रोजी भारत आणि आयर्लंड सामन्यात टीम इंडियाने नेत्रदीपक कामगिरी करत 8 विकेट्सनी सामना जिंकला होता. भारतीय संघ साखळी फेरीतील दोन्ही सामने न्यूयाॅर्क येथे खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंना विश्रांती साठी बराच वेळ मिळत आहे. या दरम्यान अनेक भारतीय खेळाडू फिरताना आपल्याला दिसत आहेत.
टीम इंडीयाचा फलंदाज रिषभ पंत, मोहम्मद सिराज आवेश खान एका रेस्टाॅरंट मध्ये पहायला मिळाले, त्यांचा सोबत भारताचा माजी दिग्गज युवराज सिंगही त्यांसोबत दिसला. यंदाच्या विश्वचषकाचा तो ब्रँड अम्बेसेडर आहे. टीम इंडीयाच्या खेळाडूंनी सोशल मीडिया वर फोटो शेअर केल्या आहेत. ज्या मध्ये ते एका हाॅटेल मध्ये डिनर करताना पहायला मिळाले.त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजानी भेदक गोलंदाजी केली होती. रिषभ पंतने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत सामना जिंकवला होता. दुसऱ्या क्रमांकासाठी त्याने रोहित शर्मा सोबत 54 धावांची भागीदारी केली होती. गोलंदाजीत मोहम्मद सिराजने देखील 13 धावा देऊन 1 विकेट मिळवले होते. भारताचा पुढचा सामना 9 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पण न्यूयाॅर्क येथील खेळपट्टी खूपच फलंदाजीसाठी खूपच खतरनाक मानली जात आहे. त्या खेळपट्टीवर खेळणे म्हणजे खेळाडूंना दुखापतीला आमत्रंण असल्याचे म्हटले जात आहे. पण आयसीसीने स्पष्ट केले आहे की भारत पाकिस्तान सामन्यांत चांगली खेळपट्टी पहायला मिळेल.
महत्तवाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी भारत करणार का संघात बदल?
पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार मोनांक पटेलनं दिली प्रतिक्रिया
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 5 सर्वात मोठे अपसेट, अमेरिका विरुद्ध पाकिस्तान सामन्याचाही समावेश