न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून सुरू होणारा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. २ जून रोजी भारतातून इंग्लंडला गेल्यानंतर भारतीय संघ तीन दिवस क्वारंटाईन राहिला. त्यानंतर भारतीय संघाने सराव सुरू केला आहे. आता या ऐतिहासिक सामन्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने, भारतीय संघ आपापसात दोन गट बनवून सराव सामना खेळताना दिसून आला.
https://twitter.com/BCCI/status/1403570720228085763?s=19
भारतीय संघाची ‘इंट्रा स्कॉड मॅच’
भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी सराव सामना करू इच्छित होता. मात्र, कोरोनामुळे भारताची ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही. या कारणाने भारतीय संघाला आपापसात दोन गट करून ‘इंट्रा स्कॉड मॅच’ खेळावी लागत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या सामन्यातील काही क्षणांचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवरून शेअर केला असून, यात सर्व भारतीय खेळाडू अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात खेळताना दिसून येत आहेत.
असा सुरू आहे सामना
या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा, कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे व यष्टीरक्षक रिषभ पंत फलंदाजी करताना दिसून. सर्व खेळाडू बचाव करत असतानाच रिषभ पुढे सरसावत फटकेबाजी करताना दिसला. त्याने अखेरच्या क्षणी बॅट उंचावली यावरून समजत आहे की, त्याने कदाचित अर्धशतक पूर्ण केले.
सर्व प्रमुख फलंदाज एकाच संघात फलंदाजी करताना दिसले त्याचप्रकारे प्रमुख गोलंदाज या सर्वांना गोलंदाजी करताना दिसत आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा व रविचंद्रन अश्विन यांच्यासह युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या व्हिडिओमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: WTC फायनलसाठी कोहलीची ‘विराट’ तयारी, ‘या’ फटक्यांचा करतोय खास सराव
चूकीला माफी नाही! भर सामन्यात पंचांशी पंगा आणि स्टंप उखडणे आले शाकिबच्या अंगाशी, झाली ‘मोठी’ कारवाई