भारतातच आयोजित होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी आता दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. बारा वर्षांचा वनवास संपवत भारतीय संघ यावेळी विजयासाठी प्रयत्न करेल. विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तयारी सुरू केली असून, 19 अशा खेळाडूंना नियमित संधी दिली जाईल यापैकी 15 खेळाडूंना विश्वचषकात निवडण्यात येणार आहे.
विश्वचषकासाठी संभाव्य खेळाडूंच्या नावांची यादी देण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर असून, संघ जाहीर करण्याची अखेरची तारीख 27 सप्टेंबर आहे. विश्वचषकाआधी भारतीय संघ आशिया चषक व ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळेल. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अखेरच्या सामन्यापर्यंत आपला विश्वचषकासाठीचा संघ घोषित करण्याची शक्यता आहे.
एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक खेळाडूंची यादी जवळपास तयार असून यामध्ये अठरा नावांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी देऊन पारखले जाईल.
दुखापतीतून सावरत असलेल्या केएल राहुल व श्रेयस अय्यर यांच्यासह संजू सॅमसन व ईशान किशन यांच्यावर देखील विशेष लक्ष असेल. तर वेगवान गोलंदाज विभागात मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर व जयदेव उनाडकत यांच्या दरम्यान थेट लढत पाहायला मिळेल.
विश्वचषकासाठी प्राथमिक भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, के एल राहुल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, शुबमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार व जयदेव उनाडकत.
(Team India Provisional Sqaud For Asia Cup And 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या-
क्रीडामंत्र्यांवर गांगुलींचा प्रभाव! अवघ्या पाच दिवसात बदलला निवृत्तीचा निर्णय
पाकिस्तान संघाविषयी रोहित काय म्हणाला, ज्यामुळे रितिकालाही नाही आवरले हसू, व्हिडिओ होतोय व्हायरल