जवळपास 7 वर्षे भारतीय संघाची सेवा करणारे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामकृष्णन श्रीधर यांच्यावर अफगाणिस्तान क्रिकेट संघात मोठी जबाबदारी आली आहे. होय, हे खरं आहे. 54 वर्षीय आर श्रीधर यांची आगामी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉट आहेत. अफगाणिस्तान संघात श्रीधर ट्रॉटच्या सपोर्ट स्टाफमध्ये दिसणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत सोशल मीडियीवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
आर श्रीधर 2014 ते 2021 दरम्यान भारतीय संघाशी संबंधित होता. 2014 मध्ये इंग्लंड मालिकेदरम्यान तो पहिल्यांदा टीमसोबत ॲक्शनमध्ये दिसला होता. ज्यामध्ये त्याने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले. बोर्डाला त्याचे काम आवडले. यामुळेच बीसीसीआयने त्याचा कार्यकाळ वाढवला आणि रवी शास्त्री यांच्यासोबत काम करण्यातही तो यशस्वी झाला.
ACB name R. Sridhar as National Team’s Asst. Coach for New Zealand and South Africa Fixtures.
More: https://t.co/B8VZlnB10t pic.twitter.com/nmCuVpCqD9
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 21, 2024
भारतीय संघात येण्यापूर्वी आर श्रीधर हैदराबाद संघात अंडर-19 आणि अंडर-16 चे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत होते. एवढेच नाही तर त्यांनी बेंगळुरू येथील एनसीएमध्येही काम केले आहे.
आर श्रीधर हे अंडर-19 विश्वचषक 2014 मध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संघाशी संबंधित होते. त्याच वर्षी, त्याला आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्या पंजाब किंग्ज) मध्ये सामील होण्याची संधी मिळाली. येथे त्यांनी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम केले. आर श्रीधर हे आंध्र क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जवळपास 2 वर्षे संबंधित होते. या संघाशिवाय त्यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून त्रिपुरा संघाचेही प्रशिक्षकपद भूषवले आहे.
हेही वाचा-
‘जर जास्त पैसे मिळाले…’, राहुल द्रविडने सांगितले त्याच्या बायोपिकमध्ये कोणी भूमिका करावी?
रोहित-कोहलीसोबत यशस्वीलाही मिळाला पुरस्कार, जाणून घ्या यादीत कोणा-कोणाचा समावेश
ऍशेस की बॉर्डर-गावस्कर, कोणती मालिका मोठी? कांगारू गोलंदाजाने दिले आश्चर्यकारक उत्तर