भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (14 जुलै) आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये हँगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित केला जाणार आहेत. याच स्पर्धांमध्ये हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघही भाग घेणार आहे. नेहमीप्रमाणे संघाचे उपकर्णधारपद स्मृथी मंधाना भूषवणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि स्मृथी मंधाना (Smriti Mandhana) यांच्याव्यतिरिक्त संघात जेमिमाह रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष यांची नावे आहेत. यावर्षी आशियाचई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामने टी-20 प्रकारात खेळले जाणार आहेत. दरम्यान ही दुसरी वेळ आहे, भारतीय संघ एखाद्या मल्टी स्पोर्ट्स इवेंटमध्ये खेळणार आहे. मागच्या वर्षी बर्मिंघममध्ये आयोजित राष्ट्रकूल स्पर्धांमध्येही भारतीय महिला क्रिकेट संघाने भाग घेतला होता. त्यावेळी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. राष्ट्रकूल स्पर्धेतील पाच सामन्यात 11 विकेट घेणाऱ्या रेनुका सिंग हिला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघात घेतले गेले नाहीये.
आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवडलेला भारतीय महिला संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवाणी, तितस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा चेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बरेड्डी. (Team India (Senior Women) squad for 19th Asian Games announced.)
महत्वाच्या बातम्या –
शाहिद आफ्रिदीचा मोठा दावा! भारतात पाकिस्तान संघावर झाला होता हल्ला
इटलीच्या खेळाडूला नमवत जोकोविचची Wimbledon फायनलमध्ये एन्ट्री, 24व्या Grand Slam किताबावर असेल नजर