ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, तब्बल वर्षभरानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराह याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर आशियाई गेम्स मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला उपकर्णधार करण्यात आले.
वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी जवळपास सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली तसेच उपकर्णधार हार्दिक पंड्या हे या संघाचा भाग नाहीत.
संघाचे नेतृत्व पुनरागमन करत असलेल्या जसप्रीत बुमराह याच्याकडे देण्यात आले आहे. तर एशियन गेम्ससाठी कर्णधार म्हणून निवडलेल्या ऋतुराज गायकवाड याला उपकर्णधार बनवले गेले. दुखापतीतून सावरलेले प्रसिद्ध कृष्णा व वॉशिंग्टन सुंदर हे देखील संघात आपली जागा बनवण्यात यशस्वी ठरले.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
(Team India Sqaud Announced For Ireland Tour Bumrah Makes Comeback And Lead Team)
महत्वाच्या बातम्या –
ASHES 2023 । चौथ्या दिवसाखेर इंग्लिश चाहत्याचा ख्वाजाशी पंगा! लॅबुशेननं मागे वळून काय केलं पाहाच
धोनीने कलेक्शनमधून बाहेर काढली ‘ही’ जबरदस्त मसल कार, रांचीत ड्राईव्ह करतानाचा व्हिडिओ व्हायरल