---Advertisement---

महिला टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा! हरमनच्या नेतृत्वात सादर करणार आव्हान; शिखाचे पुनरागमन

On: बुधवार, डिसेंबर 28, 2022 9:26 PM
Team India
---Advertisement---

फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ महिला संघाच्या निवड समितीने बुधवार (28 डिसेंबर) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2020 विश्वचषकाप्रमाणे चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल.

 

दक्षिण आफ्रिका येथे 2022 महिला टी20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या ‌2020 टी20 विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव‌ केलेला. त्यामुळे पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याचा मानस भारतीय संघाचा असेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 मालिकेतीलच बहुतांश खेळाडू या संघात दिसणार आहेत. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल तर, स्मृती मंधाना उपकर्णधारपद सांभाळेल. या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिची निवड करण्यात आली आहे. शिखा तब्बल 14 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे व‌ पुजा वस्त्राकार (तंदुरुस्त असल्यास).

राखीव खेळाडू-
एस. मेघना, स्नेह राणा व मेघना सिंग

(Team India Sqaud Announced For Womens T20 World Cup Shikha Pandey Comeback)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केनने दिला पाकिस्तानला पेन! 722 दिवसांनी शतक ठोकत न्यूझीलंडला मिळवून दिली आघाडी 

आयसीसी महिला एमर्जिंग खेळाडू पुरस्कारासाठी टीम इंडियाच्या दोन ‘धाकड गर्ल’ नामांकित; अशी होती कामगिरी 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---