क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय ज्येष्ठ निवड समितीची सोमवारी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या तीन टी -20, तीन वनडे आणि चार कसोटी सामन्यांकरिता संघाची घोषणा करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टीम इंडियाची टी -२०, वनडे आणि कसोटी संघांची घोषणा
टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती
#TeamIndia T20I squad: Virat Kohli (Capt), Shikhar, Mayank Agarwal, KL Rahul (vc & wk), Shreyas Iyer, Manish, Hardik Pandya, Sanju Samson (wk), Ravindra Jadeja, Washington Sundar, Yuzvendra Chahal, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Navdeep Saini, Deepak Chahar, Varun Chakravarthy
— BCCI (@BCCI) October 26, 2020
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
#TeamIndia ODI squad: Virat Kohli (Capt), Shikhar Dhawan, Shubman Gill, KL Rahul (vc & wk), Shreyas Iyer, Manish Pandey, Hardik Pandya, Mayank Agarwal, Ravindra Jadeja, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohd. Shami, Navdeep Saini, Shardul Thakur #AUSvIND
— BCCI (@BCCI) October 26, 2020
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेट- कीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
#TeamIndia Test squad: Virat Kohli (Capt), Mayank Agarwal, Prithvi Shaw, KL Rahul, Cheteshwar, Ajinkya(vc), Hanuma Vihari, Shubman Gill, Saha (wk), Rishabh Pant (wk), Bumrah, Mohd. Shami, Umesh Yadav, Navdeep Saini, Kuldeep Yadav, Ravindra Jadeja, R. Ashwin, Mohd. Siraj #AUSvIND
— BCCI (@BCCI) October 26, 2020
या दौऱ्यात कमलेश नगरकोटी, कार्तिक त्यागी, ईशान पोरेल आणि टी नटराजन हे चार अतिरिक्त गोलंदाज भारतीय पथकासह प्रवास करतील. तर बीसीसीआय मेडिकल टीम रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांच्या प्रगतीवर नजर ठेवेल.
बीसीसीआयचे मानद सचिव जय शाह यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-पुजारा, विहारी आणि शास्त्री लवकरच होणार युएईला रवाना, ‘हे’ आहे कारण
-अखेर सूर्यकुमार यादवची प्रतिक्षा संपली, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व?
-स्पर्धेतून बाहेर गेलेली चेन्नई ठरणार ‘या’ संघांसाठी डोकेदुखी; बिघडवणार प्लेऑफची गणितं?
ट्रेंडिंग लेख-
-IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
-कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती






