---Advertisement---

स्मृती मानधनानं आयसीसी क्रमवारीत मारली मुसंडी!

On: मंगळवार, जून 18, 2024 5:05 PM
Smriti-Mandhana-T20I-Record
---Advertisement---

टीम इंडियाची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधनाने दक्षिण अफ्रिका विरुद्ध मानधनाने शानदार शतकी खेळी खेळली होती. या सामन्यात तिने 117 धावा ठोकल्या होत्या. तिच्या खेळीने भारताने हा सामना 143 धावांनी जिंकला होता. या दरम्यान आता स्मृती मानधनाने आयसीसी क्रमवारीत मोठी मुसंडी मारली केली आहे.

स्मृती मानधनाने आयसीसी वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. वनडे मध्ये तिची 715 रेटिंग आहे. याअधी ती पाचव्या स्थानी होती. तर टी20 मध्येही 715 रेटिंगसह ती पाचव्या स्थानी आहे. तर आशिया मधील आयसीसी मध्ये टाॅप-5 मधील पहिली खेळाडू आहे. स्मृतीने आतापर्यंत 83 वनडे सामने खेळली आहे. ज्यामध्ये तिने 3359 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 6 शतके झळकावली आहेत. तर 135 हा तिचा सर्वाधिक स्कोअर आहे. तर टी20 मध्ये तिने 113 सामने खेळले आहेत 3220 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तिने 23 अर्धशतके मारले आहेत.

स्मृती मानधनाने घेतली आयसीसी क्रमवारीत झेप

आयसीसी वनडे रँकिंग -3

आयसीसी टी20 रँकिंग – 5

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात तिने शतक झळकावले, या साठी तिला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. पुढील दोनही सामने बेंगलोर येथील चिन्नस्वामी स्टेडियम येथे होणार आहे. या सोबतच या मालिकेत  1 टेस्ट सामना आणि 3 टी20 सामने देखील होणार आहेत.

डब्लयू पी एल मध्ये स्मृती मानधना चांगल्या फाॅर्म मध्ये पहायला मिळाली. महिला प्रमियर लीग मध्ये तिने यंदाच्या वर्षी राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला ट्राॅफी जिंकवून दिली आहे. आरसीबी साठी ट्राॅफी जिंकवून देणारी ती पहिली कर्णधार आहे.

महत्तवाच्या बातम्या-

सुपर-8 सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; सरावादरम्यान स्टार खेळाडूला दुखापत
पाकिस्तानी क्रिकेटपटूची भररस्त्यात सटकली, थेट चाहत्यावरच गेला धावून; VIDEO व्हायरल
भारतीय संघात कुलदीप यादवला संधी मिळाल्यास कोणत्या खेळाडूचा होणार पत्ता कट?

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---