श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of India) असून उभय संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका (2 Matches Test Series) खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदाच कसोटी सामना खेळताना भारतीय संघाने या सामन्यात १ डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकत यजमानांनी मालिकेत १-० अशी घेतली आहे.
यानंतर उभय संघ दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी (Second Test) एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे भिडणार आहेत. हा सामना १२ ते १६ मार्चदरम्यान दिवस-रात्र स्वरुपात खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी बुधवारी (०९ मार्च) भारतीय खेळाडू मोहालीवरून बंगळुरूला गेले आहेत. तिथे त्यांनी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली सरावही सुरू (Indian Players Started Practicing) केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारतीय संघातील काही खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियाद्वारे भारतीय संघाने मोहालीतून बंगळुरूला प्रस्थान केल्याची माहिती दिली आहे. भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मयंक अगरवाल आणि फिरकीपटू आर अश्विन यांनी सोशल मीडियावर बंगळुरूला उड्डाण भरल्याच्या पोस्ट केल्या आहेत.
Ready to take off! pic.twitter.com/oKkvQjZIK8
— Mayank Agarwal (@mayankcricket) March 9, 2022
https://www.instagram.com/tv/Ca4KHawhQ7Z/?utm_source=ig_web_copy_link
याचदिवशी भारतीय संघाचा ताफा बंगळुरूला पोहोचलाही (Indian Players Landed In Bengaluru) आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पोहोचल्यानंतर लगेचच सरावालाही सुरुवात केली आहे. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचे सराव करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. यात नुकताच कसोटी संघात पुनरागमन झालेल्या अक्षर पटेललाही समावेश आहे. अक्षरला फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागी संघात सहभागी केले गेले आहे. त्याच्याबरोबरच विराट कोहली, मोहम्मद सिराज, शुबमन गिल आणि इतर खेळाडू प्रशिक्षक द्रविड व विक्रम राठोड यांच्या देखरेखीखाली खेळताना दिसत आहेत.
Getting Pink Ball Ready 😀😎#TeamIndia | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/94O8DDzs9x
— BCCI (@BCCI) March 9, 2022
— BCCI (@BCCI) March 9, 2022