भारतीय क्रिकेट संघ आशिया चषकात सामील होण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) दाखल झाला आहे. रोहित शर्माचे नेतृत्वातील भारतीय संघाने येथे सरावाला सुरुवात केलीये. २८ ऑगस्ट रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत आपल्या अभियानाची सुरुवात करेल. जगातील सर्वात श्रीमंत ठिकाणांमध्ये समावेश होत असलेल्या दुबईत भारतीय संघ ज्या ठिकाणी राहत आहे ती जागा देखील एखाद्या राजेशाही ठिकाणापेक्षा कमी नाही.
आशिया कपसाठी दुबईला पोहोचलेला भारतीय संघ सध्या पाम जुमेराह रिसॉर्टमध्ये मुक्कामी आहे. या हॉटेलमध्ये फक्त भारतीय संघाची राहण्याची सोय केली गेलीये. इतर संघ बिझनेस बे हॉटेलमध्ये थांबले आहेत.
https://www.instagram.com/p/CcAZHlhhHXy/?igshid=YmMyMTA2M2Y=
https://www.instagram.com/p/CSrgtpSBugm/?igshid=YmMyMTA2M2Y=
जगातील महागड्या हॉटेलपैकी एक असलेल्या पाम जुमेराह हॉटेलमध्ये अत्याधुनिक सुविधांची कुठलीही चायनीज कमतरता नाही. हॉटेलच्या आत मॉल जिथे तुम्ही खरेदी करू शकता. त्याशिवाय आतमध्ये 3D, 4DX थिएटर्स देखील आहेत. हॉटेलमध्ये एक अशी प्रेक्षणीय जागा असून, जिथून संपूर्ण शहराचे सुंदर दृश्य पाहता येते.
https://www.instagram.com/p/CSrgtpSBugm/?igshid=YmMyMTA2M2Y=
हॉटेलमध्ये इन्फिनिटी स्विमिंग पूल, वॉटर स्पोर्ट्स, नेत्रदीपक समुद्रकिनारा दृश्ये असलेले रेस्टॉरंट, व्हीआयपी कॅबना, मैदानी मनोरंजन क्षेत्रे आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध आहेत. एक स्पा देखील आहे जिथे मसाजपासून आईस बाथपर्यंत सुविधा आहे. इतकेच नव्हे तर हॉटेलच्या मालकीचा स्वतःचा समुद्रकिनारा आहे. या हॉटेलमधील सुविधांचा विचार केल्यास याचादेखील अंदाज लावता येऊ शकतो की, हॉटेलमधील रहिवासाचे भाडेही अतिउच्च असेल. या हॉटेलमध्ये एक दिवसाचे भाडे तीस हजार असून, पर्यटनाच्या हंगामावेळी तेच भाडे ५० हजारांपेक्षा पेक्षा जास्त जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकातील ‘हे’ विक्रम मोडणे नाहीये सोपे, सेहवागने केलाय गोलंदाजीत अजब कारनामा
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा सर्वात अवघड ‘पेपर फुटला’, महत्वाच्या फलंदाजाची कमजोरी झाली उघड
हरभजनला मारायला हॉटेलच्या रूमपर्यंत गेलेला अख्तर, ‘या’ गोष्टीमुळे पेटला होता वाद