---Advertisement---

BREAKING: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकांसाठी टीम इंडियाची घोषणा; हार्दिकच्या नेतृत्वात ‘नया दौर’ सुरू

On: मंगळवार, डिसेंबर 27, 2022 10:39 PM
Hardik-Pandya
---Advertisement---

भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या व तीन वनडे सामन्यांच्या मालिकंसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात भारतीय संघ टी20 मध्ये श्रीलंकेचे आव्हान स्वीकारेल. नियमित कर्णधार रोहित शर्मा व अनुभवी विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना या मालिकेसाठी संधी दिली गेली आहे. तर, वनडे मालिकेत रोहितच कर्णधारपदाची भूमिका बजावेल.

काही दिवसांपूर्वी बरखास्त केलेल्या चेतन शर्मा यांच्याच नेतृत्वाखालील निवड समितीने हे संघ जाहीर केले. टी20 संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या जबाबदारी सांभाळेल. तर, सूर्यकुमार यादव हा उपकर्णधर असेल. नुकतेच आयपीएल लिलावामध्ये कोट्यावधी रुपये कमावलेले वेगवान गोलंदाज शिवम मावी व मुकेश कुमार प्रथमच भारतीय संघाचा भाग असतील.

वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असला तरी, उपकर्णधारपदावरून केएल राहुल याची गच्छंती करण्यात आली आहे. वनडे संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या हा असेल. अनुभवी सलामीवीर शिखर धवन व यष्टीरक्षक रिषभ पंत यांना दोन्ही संघात जागा मिळालेली नाही. तसेच, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हा देखील दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने संघात सहभागी नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.

 

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

(Team India T20 & ODI Sqaud For Series Against Srilanka Hardik Lead In T20I)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे 5 महिने क्रिकेटपासून दूर? मुंबईचे 17 कोटी पाण्यात 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---