बीसीसीआयने भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघ 24 जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे.
भारताच्या या टी20 संघात उपकर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. त्याला नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.
त्याचबरोबर युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला टी20 संघात स्थान मिळाले नाही. श्रीलंकेविरूद्ध टी20 मालिकेच्या तिसर्या आणि अंतिम सामन्यात सॅमसनला संधी देण्यात आली होती. पण तो फक्त 2 चेंडू खेळू शकला आणि त्याने 6 धावा केल्या.
तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंडयालाही भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. यामागे हार्दिकची तंदुरुस्ती हे कारण असू शकते.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघात रोहितबरोबरच मोहम्मद शमीचेही पुनरागमन झाले आहे. त्यालाही श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती.
न्यूझीलंड विरुद्धची ही टी20 मालिका 2 फेब्रुवारीला संपणार आहे. त्यानंतर 5 ते 11 फेब्रुवारीदरम्यान वनडे मालिका होईल. तसेच त्यानंतर 2 सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. वनडे आणि कसोटीसाठी अजून भारतीय संघाची घोषणा झालेली नाही.
न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर
शार्दुलने सांगितलं त्या विस्फोटक खेळीचं गुपीत!
वाचा👉https://t.co/pY2EQfRYNY👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @imShard— Maha Sports (@Maha_Sports) January 12, 2020
विराट कोहलीचे परखड मत, खेळाडूंची एकमेकांशी तुलना करणं बंद करा
वाचा👉https://t.co/YfvAQnKS8W👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 12, 2020