भारतीय संघ शुक्रवारपासून (२७ नोव्हेंबर) सिडनी येथे वनडे मालिकेने ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात करेल. भारतीय संघ दौऱ्याची विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, भारतीय संघाचा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघू हा ऑस्ट्रेलियात पोहोचूनही संघाशी जोडला गेला नाही. रघु हा गेल्या १० वर्षापासून भारतीय प्रशिक्षकांचा सहाय्यक म्हणून काम करतो.
रघूची कोरोना चाचणी आला होती पॉझिटिव्ह
एका क्रीडा वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, भारतीय संघाचा थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघू याचा ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, नंतर हा अहवाल खोटा असल्याचे समोर आले. या काळात तो भारतीय संघापासून वेगळा राहत होता. त्यानंतर, तो भारतीय संघाशी जोडला जाण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. भारतीय संघाला अजूनही त्याच्या येण्याची प्रतीक्षा आहे.
भारतीय संघ व्यवस्थापकाने उत्तर देण्याचे टाळले
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द सिडनी हेरॉल्ड मॉर्निंग’ ने भारतीय संघाचे व्यवस्थापक मौलिक पारेख यांच्याशी या बातमीविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी याला उत्तर दिले नाही. न्यू साउथ वेल्सच्या आरोग्य विभागाने देखील या विषयावर बोलण्याचे टाळले आहे.
१० वर्षांपासून आहे भारतीय संघाचा सदस्य
बेंगलोरचा रहिवासी असलेला रघू २०११ सालापासून भारताच्या प्रशिक्षक गटाचा सदस्य आहे. भारतीय फलंदाजांना सातत्याने १५० किमी/प्रतितास इतक्या वेगाच्या चेंडूंचा सराव देण्याचे काम तो करतो. सर्व भारतीय फलंदाज आपल्या यशात आरोग्याचे योगदान असल्याचे जाहीरपणे कबूल करतात. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी रघू याची कोरोना चाचणी नकारात्मक आली होती. त्याच्या जागी, दयानंद गिरानी याची थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट म्हणून निवड करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने अवलंबवावी ‘ही’ त्रिसूत्री
Video – पालकत्व रजा घेतल्याबद्दल अखेर विराटने सोडले मौन, म्हणाला…
आश्चर्यकारक! ‘करोडपती’ मलिंगा आई-वडिलांना दहा वर्षे भेटलेलाच नाही
ट्रेंडिंग लेख –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सर्वाधिक जास्त वेळा नाबाद राहणारे ३ भारतीय फलंदाज
ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टी२०त सर्वाधिक वेळा तंबूचा रस्ता दाखवणारे टीम इंडियाचे ३ गोलंदाज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारे ३ भारतीय फलंदाज; धोनीचाही समावेश