भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना निम्मा भारतीय संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. भारताने कर्णधार रोहित शर्मासह शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि सरफराज खान यांच्या विकेट्स गमावल्या आहेत. रिषभ पंतसोबत रवींद्र जडेजा क्रीजवर आहे. एजाज पटेलने आतापर्यंत 3 बळी घेतले आहेत.
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचा टाॅप ऑर्डर स्वस्तात बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्या व्यतीरिक्त पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटी सामना खेळणाऱ्या जयस्वाल आणि सरफराज खान यांच्याकडून सपशेल फ्लाॅप कामगिरी पाहायला मिळाली. झटपट विकेट्स गेल्याने टीम इंडिया अडचणीत आली आहे.
– Rohit dismissed for 11 runs.
– Jaiswal dismissed for 5 runs.
– Gill dismissed for 1 run.
– Kohli dismissed for 1 run.
– Sarfaraz dismissed for 1 run.INDIA 29 FOR 5 AT WANKHEDE pic.twitter.com/YVTySnf338
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2024
न्यूझीलंडचा दुसरा डाव 174 धावांवर आटोपला. भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. किवी संघाला दुसऱ्या डावात लवकर पराभूत करण्याचे काम रवींद्र जडेजाने केले. पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही त्याने आपले पंजे उघडले. तत्पूर्वी, न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात भारताने 263 धावा केल्या होत्या. पहिल्या डावानंतर भारताकडे 28 धावांची आघाडी होती.
हेही वाचा-
कसोटीत टी20 खेळतोय हिटमॅन, पिचवर अर्धा तासही थांबेना! किंग कोहलीकडून ही निराशा..
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे संघ (टाॅप-5)
‘लक्ष्य गाठण्यासाठी चांगली फलंदाजी…’; अश्विनने कबूल केले की धावांचा पाठलाग करणे सोपे नाही!