भारताचा श्रीलंका दौऱ्यावर आज शेवटचा टी20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना पल्लेकेले या मैदानावर रंगणार आहे. भारत आणि श्रीलंका (India and Sri Lanka) यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका होती. त्यातील आज शेवटचा सामना आहे. भारतानं सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) नेतृत्वाखाली या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, खलील अहमद
श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका(कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो
दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. तर पहिल्या टी20 सामन्यात भारतानं 43 धावांनी विजय मिळवला. पहिल्या सामन्यात भारतासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवनं (Suryakumar yadav) 26 चेंडूत 58 धावांची शानदार खेळी केली होती. त्याच्या खेळीत त्यानं 8 चौकारांसह 2 उत्तुंग षटकार ठोकले होते. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 223.08 राहिला होता. या सामन्याचा सूर्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्या शॉर्ट टर्म ऑप्शन…! टी20 मालिका जिंकूनही दिग्गजाने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वावर उपस्थित केले प्रश्न
“पाकिस्तानात येऊन खेळून दाखवा” पाकिस्तानचा माजी खेळाडू हरभजनवर भडकला
ऑलिम्पिक गाजवणाऱ्या मनू भाकरचे प्रशिक्षक 3 वर्षांपासून बेरोजगार; म्हणाले, “मला माझा मासिक पगारही…”