क्रिकेट इतिहासात एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज होऊन गेलेत, ज्यांनी धावा अन् शतकांचा पाऊस पाडला आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, काही भाग्यवान फलंदाज असेही होते, जे आपल्या क्रिकेट करिअरमध्ये कधीही शून्य धावसंख्येवर बाद झाले नाहीत. भारतीय संघातही असा एक फलंदाज होता, जो आपल्या कारकिर्दीत कधीही शून्यावर बाद झाला नाही. या खेळाडूने भारतीय संघासाठी अनेक वर्षे क्रिकेट खेळले, पण शून्य धावसंख्येचे तोंड त्यांनी कधीच पाहिले नाही.
कधीही शून्य धावसंख्येवर बाद नाही झाले हे भारतीय फलंदाज
ते दिग्गज माजी भारतीय खेळाडू म्हणजे यशपाल शर्मा (Yashpal Sharma) होय. यशपाल यांनी ४२ वनडे सामने खेळताना ८३३ धावा केल्या होत्या. या धावा करताना त्यांनी ४ अर्धशतकेही ठोकली आहेत. वनडेत त्यांची सर्वोच्च धावसंख्या ही ८९ आहे. वनडेत भारताकडून खेळताना यशपाल हे कधीही शून्य धावसंख्येवर बाद झाले नाहीत. हे नक्कीच हैराण करणारे आहे. कारण, यशपाल ज्यावेळी क्रिकेट खेळायचे, तेव्हा वेस्ट इंडिज संघात खूप घातक गोलंदाज होते. त्यांच्या गोलंदाजीसमोर भल्या- भल्या फलंदाजांचा टिकाव लागत नव्हता.
Happy Birthday to Yashpal Sharma who led India to victory v the feared WI team at #CWC83 https://t.co/vworD99EzC pic.twitter.com/k7Ngghc5wO
— ICC (@ICC) August 11, 2016
या खेळाडूंचाही यादीत समावेश
पीटर क्रिस्टन
दक्षिण आफ्रिका संघाचे दिग्गज फलंदाज पीटर क्रिस्टन ३ वर्षे क्रिकेट खेळला. मात्र, हे फलंदाज कधीही शून्य धावसंख्येवर बाद झाले नाहीत. पीटर यांनी ३ वर्षात ४० वनडे सामने खेळले. या सामन्यांमध्ये १२९३ धावा केल्या. या धावा करताना त्यांनी ९ अर्धशतकही ठोकले. यामध्ये ते तब्बल ६ वेळा नाबादही राहिले आहेत. त्यांची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या ही ९७ धावा होती.
केप्लर वेसेल्स
केप्लर वेसेल्स हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाकडून खेळले आहेत. त्यांनी आपल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत १०९ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यांनी १ शतक आणि २६ अर्धशतक ठोकत ३३६७ धावा ठोकल्या. वनडेत त्यांची सर्वोच्च धावसंख्या ही १०७ धावा होती. वेसेल्स यांनी आपल्या कारकिर्दीत कधीही शून्य धावसंख्येवर बाद झाले नाहीत. ते तब्बल ७ वेळा नाबाद राहिले होते.
जॅक्स रोडलफ
दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज जॅक्स रोडलफ यांनी ४५ वनडे सामने खेळताना ११७४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्यांनी ७ अर्धशतकेही ठोकली आहेत. ते तब्बल ६ वेळा नाबादही राहिले आहेत. वनडेत जॅक्स यांची सर्वोच्च धावसंख्या ही ८१ धावा होती. तेदेखील आतापर्यंत एकदाही शून्य धावसंख्येवर बाद झाले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिल ते ऋतुराज गायकवाड, भारतीय संघाचे भविष्यातील ५ सलामीवीर; पाहा संपूर्ण यादी
‘विराटने कर्णधारपद सोडणे विरोधी संघासाठी धोक्याची घंटी’, असे का म्हणाला ग्लेन मॅक्सवेल? घ्या जाणून
पंड्या बंधू खेळणार वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून, हार्दिकची वहिनीने शेअर केला भावूक व्हिडिओ