---Advertisement---

पंड्या बंधू खेळणार वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून, हार्दिकच्या वहिनीने शेअर केला भावूक व्हिडिओ

On: शुक्रवार, मार्च 18, 2022 12:23 PM
Hardik-Pandya-Krunal-Pandya-Pankhuri-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचे अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या आयपीएल २०२२ हंगामात वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा हार्दिक आणि कृणाल वेगवेगळ्या आयपीएल फ्रेंचायझीसाठी खेळणार आहेत. हार्दिक पंड्याची वहिनी म्हणजेच कृणालची पत्नी पंखुरी शर्माने आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्याआधी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

मागच्या हंगामापर्यंत हार्दिक आणि कृणाल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे महत्वाचे खेळाडू होते. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी या दोघांनाही मुंबईने रिलीज केले आणि मेगा लिलावातही त्यांना खरेदी केले नाही. मुंबईने रिलीज केल्यानंतर आयपीएलची नवीन फ्रेंचायझी गुजरात टायटन्सने मेगा लिलावाच्या आधीच हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला १५ कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले आणि संघाचे नेतृत्वही त्याच्याकडेच सोपवले. हर्दिकला आयपीएल संघाचे नेतृत्व करण्याची मिळालेली ही पहिलीच संधी आहे.

तसेच दुसरीकडे कृणाल पंड्या (Krunal Pandya) याचा विचार केला, तर तो देखील आयपीएलमध्ये नव्याने सामील झालेला संघ लखनऊ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. लखनऊने कृणालला खरेदी करण्यासाठी ८.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

कृणालची पत्नी पंखुरी शर्मा (Pankhuri Sharma) हिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे, जेव्हा ती स्टेडियममध्ये जाऊन पंड्या बंधूंना एकत्र प्रोत्साहन द्यायची. परंतु तिला दुखः आहे की, आगामी हंगामात दोन्ही भाऊ एका संघात खेळू शकणार नाहीत. अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंखुरीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हार्दिक आणि कृणाल एकत्र खेळताना आणि मजा मस्ती करताना दिसत आहेत.

“मागच्या ६ वर्षांमध्ये मी तुम्हा दोघांसाठी एकाच स्टॅन्डमधून चीयर केले आहे, पण यावेळी गोष्ट वेगळी आहे. तुम्हा दोघांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहून थोड्या वेदना होतील. मात्र, हार्दिक पांड्या मी तुला दुसऱ्या स्टॅन्डमधून प्रोत्साहन देत राहिल. आताही आणि नेहमी !” अशा कॅप्शनसह पंखुरीने ही भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CbMrChtJ8PO/

दरम्यान, आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना २९ मार्चला खेळला जाईल. यावर्षी आठ ऐवजी १० संघ मैदानात असल्यामुळे सामन्यांची संघाही वाढली आहे. आगामी हंगामात एकून ७० सामने खेळले जातील.

महत्वाच्या बातम्या –

आरसीबीचा १०.७५ कोटींच्या हुकमी एक्काचा ‘या’ गोष्टीमुळे वाढलाय आत्मविश्वास, आयपीएल २०२२मध्ये दाखवणार जलवा

काय सांगता! आयपीएल २०२२ पूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचा ‘हा’ स्टार खेळाडू क्रिकेटला ठोकणार रामराम?

चौथ्या डावात १००० पेक्षा जास्त चेंडू खेळत पाकिस्तानने वाचवला सामना; कसोटीत ‘अशी’ कामगिरी करणारा दुसराच संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---