पुढील वर्षी इंग्लंडमध्ये वनडे विश्वचषक होणार आहे. त्यामुळे जवळ जवळ सर्व संघांनी या विश्वचषकासाठी तयारी सुरु केली आहे. भारतीय संघाचीही या विश्वचषकासाठीची तयारी सुरु झाली आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने आणि भारताचा कर्णधार विराट कोहलीने काही मागण्या केल्या आहेत.
यात विश्वचषकादरम्यान केळी उपलब्ध असाव्यात, तसेच ट्रेन प्रवासावेळी आरक्षित कोच असावा आणि या संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंना त्यांच्या पत्नीची किंवा प्रेयसीची सोबत असावी अशा मागण्या केल्या आहेत.
या मागण्या भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील हैद्राबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीआधी संघ व्यवस्थापन आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती(सीओए) यांच्यात झालेल्या आढावा बैठकीत करण्यात आल्या आहेत.
याबद्दल सुत्रांनी सांगितले की “इंग्लंड क्रिकेट बोर्ड भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावेळी त्यांच्या आवडीचे फळे देण्यात अपयशी ठरले. पण सीओए या मागण्यांमुळे आश्चर्य चकीत झाले आहे आणि त्यांनी सांगितले की खेळाडूंनी संघ व्यवस्थापकांना बीसीसीआयच्या पैशांनी केळी विकत घ्यायला सांगायला हवे होते.”
“या बैठकीत अन्य मागण्याही करण्यात आल्या, जसे की योग्य जीम असणारे हॉटेलचे बुकींग आणि परदेश दौऱ्यावेळी खेळांडूंबरोबर पत्नींच्या सोबत असण्याच्या कालावधी आणि प्रोटोकॉल याचीही चर्चा करण्यात आली.”
या बैठकीसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली, कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद हे देखील उपस्थित होते.
खेळाडूंनी विश्वचषकावेळी इंग्लंडमध्ये ट्रेनने प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण याबद्दल सीओएने सुरक्षिततेचा मुद्दा मांडला आहे. याबद्दल एका रिपोर्टप्रमाणे सुत्रांनी सांगितले की “सीओए या गोष्टीसाठी खूप सहमत नाही कारण त्यांना सुरक्षिततेबाबत काळजी वाटत आहे.’
‘पण कोहलीने माहिती दिली की इंग्लंड संघ ट्रेनने प्रवास करत होता. संघ ट्रेनचा कोच आरक्षित करावा. सीओएला भारतीय संघाला ट्रेनमध्ये भारतीय चाहत्यांचा त्रास होऊ शकतो, याची काळजी वाटत आहे. असे असले तरी या समीतीने काही झाले तर सीओए आणि बीसीसीआय याला जबाबदार रहाणार नाही अशी अट घालून यासाठी परवानगी दिली आहे.’
त्याचबरोबर सीओए या वर्षाअखेरीस आॅस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये खेळाडूंच्या पत्नींसाठी बसची योय करणार आहे. याबद्दल सुत्रांनी सांगितले की ‘मागे काही अशा घटना घडल्या की काही खेळाडू त्यांच्या पत्नीबरोबर वैयक्तिक प्रवास करत होते. त्यामुळे बोर्डाला ही गोष्ट थांबवायची आहे. कारण त्यामुळे संघभावना निर्माण होण्यावर परिणाम होत आहे.’
महत्त्वाच्या बातम्या:
–विंडीज संघाचे केरळात नारळपाणी देत ढोल ताशांच्या निनादात जंगी स्वागत, पहा व्हिडिओ
–देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ
–२०१९ विश्वचषकात विराटला धोनीची गरज आहे, महान खेळाडूचे परखड मतं
–ते सेलिब्रेशन २० वर्षीय खलील अहमदला पडले महागात