---Advertisement---

केपटाऊनमध्ये विराटसेनेचा ‘भारतीय’ पाहुणचार, बीसीसीआयने शेअर केलेला हा व्हिडिओ जिंकेल तुमचंही मन

On: सोमवार, जानेवारी 10, 2022 4:45 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला होता. आता या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ केपटाऊनमध्ये (Capetown) दाखल झाला आहे. सध्या भारतीय संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य झाल्याशिवाय राहणार नाही.(Indian team welcome in Capetown)

भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले होते. ऑमीक्राॅनमुळे हे बदल करण्यात आले होते. ज्यामुळे ही मालिका उशिराने सुरू करण्यात आली होती. तसेच टी२० मालिका देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

यानंतर आता कसोटी मालिकेत विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. आता अंतिम सामना निर्णायक सामना असणार आहे.

असे झाले भारतीय संघाचे स्वागत
तत्पूर्वी तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ केपटाऊनला पोहचला आहे. बीसीसीआयने (Bcci) आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय संघाचा जोहान्सबर्गपासून ते केपटाऊनपर्यंत पोहचण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. भारतीय खेळाडू ज्यावेळी केपटाऊनमध्ये पोहोचले, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतील काही कलाकारांनी पारंपारिक नृत्य सादर केले. तसेच हॉटेलमध्ये प्रवेश करताच, भारतीय संगीत वाजवण्यात आले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CYeKtqZpp9F/?utm_source=ig_web_copy_link

असा आहे भारतीय संघ :विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल.

महत्वाच्या बातम्या :

कोविडच्या वाढत्या समस्येमुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा फक्त महाराष्ट्रात भरवण्याचा बीसीसीआयचा विचार : रिपोर्ट

विराटच्या पुनरागमनामुळे कोणाला बाकावर बसवणार? अंतिम कसोटीसाठी अशी असेल ‘भारताची प्लेइंग इलेव्हन’

हे नक्की पाहा :

सचिनच्या सल्ल्याने पालटली कारकीर्द पण सचिनमुळेच जगभर ट्रोल झालेला Lord Thakur |  Sachin Tendulkar

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---