भारतीय संघाची या वर्षातील वनडे क्रिकेटमधील कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग तिसरी वनडे मालिका जिंकली. याआधी भारताने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर आणि फेब्रुवारीमध्ये भारतात याच वेस्ट इंडिज संघाला क्लीन स्वीप केले होते. वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला वनडे मालिका गमवावी लागली होती.
अनुभवी खेळाडू संघात नसताना, जेव्हा जेव्हा युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे तेव्हा, त्यांनी आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे की, भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत याची प्रचिती पुन्हा एकदा सर्वांना आली. असे असले तरी, आणखी वर्षभराने भारतातच होणाऱ्या वनडे विश्वचषकाआधी भारतीय संघाला एक मोठी समस्या भेडसावत आहे.
भारतीय संघाने या वर्षी सलग तीन वनडे मालिका जिंकल्या असल्या तरी, मधल्या फळीतील फलंदाज सातत्याने अपयशी ठरत आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने ११ ते ४० षटकांत १७० धावा केल्या खऱ्या पण त्यासोबतच ५ बळी देखील गमावले. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी गमावून १७५ धावा जोडल्या होत्या. या वर्षी, जर आपण मधल्या षटकातील (११ ते ४० षटके) कामगिरीबद्दल बोललो तर, भारताचे प्रत्येक डावात मधल्या षटकांत सरासरी ४.१८ गडी बाद झाले आहेत. यावर्षी खेळल्या गेलेल्या ११ वनडे सामन्यांमध्ये भारताने मधल्या षटकात एकूण ४६ बळी गमावले आहेत. आयसीसीचे पूर्णवेळ सदस्य असलेल्या देशांपैकी मधल्या षटकांमध्ये केवळ वेस्ट इंडिज (५.२९), ऑस्ट्रेलिया (५.२५) आणि झिम्बाब्वे (५) यांनीच भारतापेक्षा खराब कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या आधी भारतीय संघाला या कमजोरीवर काम करावेच लागेल. अन्यथा सलामी कितीही चांगली असली तरी, भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता न आल्यास भारतातही पराभव पत्करावा लागू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फक्त क्षेत्ररक्षणासाठी मिळाला होता ‘मॅन ऑफ द मॅच’, सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले नाव
वेस्ट इंडीजविरुद्धची टी-२० सीरीजही नाही खेळणार केएल राहुल? रोहितसोबत ‘हे’ फलंदाज करतील ओपनिंग
आता सगळ्यांना तोंड फुटलंय! विराटवर टीका करणाऱ्यावंर सीएसकेचा खेळाडू भडकला